[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबईतल्या अंधेरीत पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर येत आहे. पाईपलाईनन फुटल्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले होते. तसेच लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाईन नेमकी कशामुळे फुटली याबाबत कुठलीच माहिती मिळाली नाही. पालिका परिसराची पाहणी करत आहे.
सध्या पालिकेतर्फे या परिसरात दुरुस्तीचे काम सुरू आहे. जवळपास 3 च्या सुमारास ही पाईपलाईन फुटली. पाण्याचा फोर्स इतका होता की पाणी ५-६ फुटापर्यंत उडत होते. पण पालिकेने घटनास्थळी धाव घेत वाहते पाणी थांबवले. तोपर्यंत परिसर जलमय झाला होता.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाईपलाईनचे किती नुकसान झाले आहे हे कॅमेराद्वारे पाहिले जाईल. नुकसानाची पाहणी करून किती दुरुस्तीची आवश्यक्ता आहे हे कळेल.
पण पालिका k west ने दिलेल्या माहितीनुसार पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत अंधेरी लोखंडवाला परिसरातील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
[ad_2]