[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: चांद्रयान-3 च्या यशानंतर (Chandrayaan 3) इस्रोचे (ISRO) जगभरात कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रायन-3 ने विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग केले. भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता पुढील अंतराळ मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे. इस्रोकडून येत्या काही दिवसात ‘आदित्य एल-1’ ही सौर मोहीम सुरू होणार आहे. या आदित्य एल-1 च्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
ISRO ची आदित्य एल-1 मोहीम ही भारतीय अंतराळ संस्थेने हाती घेतलेली सर्वात गुंतागुंतीची मोहीम असणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला ही मोहीम लाँच होणार आहे. हे मिशन अनेक अर्थांनी खास आणि वेगळे असणार आहे. अंतराळयान नेहमी सूर्याकडे पाहणार आहे. भारतीय सूर्ययान आदित्य एल-1 अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एल-1 कक्षेत ठेवण्यात येणार आहे.
पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान असणाऱ्या लॅरेंजियन पॉईंटवर आदित्य एल-1 हे अंतराळयान ठेवण्यात येणार आहे. लॅरेंजियन पॉईंटला अंतराळातील पार्किंगची जागादेखील म्हणतात. या भागात आधीपासून अनेक उपग्रह तैनात आहेत. या ठिकाणाहून आदित्य एल-1 सूर्याचा अभ्यास करणार आहे. या अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदा सूर्यमालेत स्पेस ऑब्जर्वेटरी तैनात करणार आहे. आदित्य एल-1 सूर्यावर 24 तास देखरेख ठेवणार आहे.
या मोहिमेतून काय साध्य होणार?
आदित्य L-1 अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कणांचा प्रसार आणि प्रदेश इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती प्रदान करेल, असा इस्रोच्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. पेलोडचा सूट कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअरची हालचाल आणि त्यांची वैशिष्ट्ये समजून घेणे सोपे होईल.
चांद्रयानच्या मोहिमेचं प्रमुख लक्ष्य काय?
भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रयान 3 चे प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील पाणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवणार आहे. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोव्हरसाठी ऐतिहासिक असणार आहे. रोव्हरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवणार आहे. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांचे प्रमाण किती हे शोधण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
[ad_2]