Pune News 16Year Old Boy Drowns In School’s Swimming Pool Police Investigation On

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News : मदर्स डेच्या दिवशीच स्वत:च्या लेकाचा मृत्यू पाहण्याची वेळ पुण्यातील एका आईवर आली आहे. साधना स्कूलच्या जलतरण तलावात पोहताना एका 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यात घडली. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हडपसर येथील माळवाडी काळूबाई वसाहत येथील रहिवासी असलेला कृष्णा गणेश शिंदे हा साधना शाळेतील नववीत शिकणारा विद्यार्थी आपल्या मामासोबत पोहायला गेला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जलतरण तलाव आहे. शनिवारी (13 मे) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा स्विमिंग पूलमध्ये शिरला तर त्याचे काकाही त्याच्यासोबत सामील झाले होते. कृष्णाच्या काकांच्या लक्षात आले की तो तलावात बुडाला आहे. उपस्थित इतरांनी कृष्णाला तातडीने बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. प्रयत्नानंतरही डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कृष्णाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या वेळी जलतरण तलावावर जीवरक्षक उपस्थित होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मातृदिनाच्या दिवशीच पुत्रशोक

देशभरात आज मदर्स डे मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. कुणी आईला काही गिफ्ट देत आहे तर कुणी सोशल मीडियावर आईचे फोटो स्टेटस ठेवताना दिसत आहे. मात्र याच मदर्स डेला पुण्यातील एका आईने आपल्या पोटच्या पोराला शेवटचा निरोप दिला आहे. तिने मुलाचा मृत्यू जवळून पाहिला आहे. या घटनेमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पालकांनो सावधान

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की पालक मुलांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्लास लावून देत असतात. त्यात स्विमिंग क्लासदेखील लावून देतात. आपल्या मुलाला सगळं यावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र हेच सगळं मुलाच्या जीवावर बेतलं आहे. कृष्णाच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

स्विमिंग पूल सुरक्षित आहेत का?

काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील खसगी स्विमिंग पूलमध्ये बुडून बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्विमिग पूलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. स्विमिंग पुलाबाबत अनेक खासगी बंगल्याची चौकशी करण्यात आली होती. एक दोन नाही तर किमान चार ते पाच स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच आता ही घटना पुढे आल्याने स्विमिंग पुलाजवळ सुरक्षारक्षक असतात का? याची संपूर्ण चौकशी पोलीस करताना दिसत आहे. 

[ad_2]

Related posts