[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
टायब्रेकचे नियम
– निर्धारित दोन डावांनंतर बरोबरी कायम असल्यास टायब्रेक
– टायब्रेकमध्ये सुरुवातीस २५ मिनिटांची मर्यादा असलेले दोन डाव, त्यात प्रत्येक चालीनंतर अतिरिक्त १० सेकंद
– दोन डावानंतरही बरोबरी असल्यास पुन्हा नव्याने पहिल्या डावात पांढरे मोहरे कोणाचे हे ठरणार. या दुसऱ्या टप्प्यात दहा मिनिटांची मर्यादा असलेले दोन डाव. त्यात प्रत्येक चालीनंतर अतिरिक्त १० सेकंद
– बरोबरीची कोंडी कायम असल्यास पुन्हा नव्याने पहिल्या डावासाठी मोहऱ्याचा रंग ठरणार. या वेळी डाव पाच मिनिटांचा, प्रत्येक चालीसाठी तीन सेकंद जास्त
– गुण समानच असल्यास तीन मिनिटांची मर्यादा असलेला डाव, प्रत्येक चालीसाठी दोन सेकंद जास्त
– कोंडी न फुटल्यास पुन्हा तीन मिनिटांचे दोन डाव आणि प्रत्येक चालीसाठी दोन सेकंद जास्त
– बरोबरी कायम राहिल्यास तीन मिनिटांचे डाव (प्रत्येक चालीसाठी दोन सेकंद जास्त) होणार. या वेळी दोन डावांची लढत नसेल, प्रत्येक डाव स्वतंत्र. डाव जिंकणारा विजेता
स्पर्धेतील बक्षीस
विजेत्यास ः एक लाख दहा हजार डॉलर (सुमारे ९० लाख ९५ हजार रुपये)
उपविजेत्यास ः ८० हजार डॉलर (सुमारे ६६ लाख १४ हजार रुपये)
कार्लसनला प्रज्ञानंदच्या खेळाबद्दल कमालीचा आदर आहे, असेच म्हणाले लागेल. व्यावसायिक बुद्धिबळ लीगमध्ये प्रज्ञानंद हा कार्लसनच्या संघात होता. त्या वेळी प्रज्ञानंदने आठपैकी पाच डाव जिंकले होते. कार्लसन कदाचित जलद डावांतच आपले वर्चस्व दाखवण्यास उत्सुक असावा, असे रघुनंदन गोखले ( द्रोणाचार्य पुरस्कार विजेते) यांनी सांगितले.
प्रज्ञानंदचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यावेळी म्हणाले की, “कार्लसनने डाव बरोबरीत सोडवण्याचे लक्ष्य सहज साध्य केले. बुद्धिबळात पारंपरिक डावाऐवजी जलद आणि अतीजलद डावच असावेत हा कार्लसनचा आग्रह आहे. तो या सामन्यातूनही हेच दाखवत असावा. जलद आणि अतीजलद डावांबद्दल काहीही भाकित करता येत नाही. प्रज्ञानंदने या स्पर्धेतील तीन सामने टायब्रेकरवर जिंकले आहेत; पण म्हणून त्याचा अनुभव महत्त्वाचा ठरेल, असे म्हणणे चुकीचे आहे. तो नक्कीच कार्लसनला आव्हान देण्यास तयार आहे, हे मात्र नक्की.”
[ad_2]