Five Planet Vakri In August From today 5 planets move retrogradely Planet’s reverse trick zodiac sign will make you rich

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Five Planet Vakri In August: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी गोचर करतो, तसंच काही ग्रह वक्री देखील होतात. ग्रहांच्या या गोचर आणि वक्रीचा स्थितीचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. दरम्यान आजपासून 5 ग्रह वक्री स्थितीत जाणार आहेत. ज्यामध्ये शनि, शुक्र, राहू आणि केतू आधीच वक्री स्थितीत फिरत आहेत. 

तर आजपासून बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध देखील वक्री फिरणार आहे. दरम्यान या 5 ग्रहांच्या वक्री स्थितीमुळे 4 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया ग्रहांच्या या वक्री स्थितीचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

मेष रास (Aries Zodiac)

5 ग्रहांची वक्री चाल मेष राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात फायदा होणार आहे. या काळात प्रेमविवाह होऊ शकतो. तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

पाच ग्रहांची वक्री गती मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबामध्ये असलेले वाद दूर होऊ शकतात. 

सिंह रास (Leo Zodiac)

5 ग्रहांची वक्री गती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला मोठं पद मिळू शकते. जे नोकरी करतात त्यांना या काळात बढती मिळू शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. 

तूळ रास (Tula Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी पाच ग्रहांची चाल लाभदायक ठरू शकते. या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. आकस्मिक धन प्राप्त होईल. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना नातेसंबंधाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts