Cabinet Minister Narayan Rane Said About PM Vishwakarma Yojana In Sindhudurg Maharashtra Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सिंधुदुर्ग :  जिल्ह्यातील कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा योजना सुरु करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिली आहे. तसेच या योजनेमध्ये 12 बलुतेदारांना देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. यावर बोलतांना नारायण राणे यांनी म्हटंल की, ‘विश्वकर्मा वर्ग गरीब राहिला नाही. त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.’ 

नारायण राणे यांच्याकडे केंद्रामध्ये लघु उद्योग हे खातं आहे. जर यामधून कोणी विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी केली तर त्यांना आर्थिक मदत नक्की मिळेल असं आश्वासन देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिलं आहे. दरम्यान नारायण राणे यांनी यावेळी विरोधकांवर देखील टीकास्र सोडलं आहे. तर सिंधुदुर्गाच्या पर्यटन व्यवसायावर देखील काम करणार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान 2030 पर्यंत भारताला महासत्ता बनवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2030 पर्यंत भारताला महासत्ता बनवणार असल्याचा विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, देशांत कोणत्याही पंतप्रधानांनी नऊ वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला 10 व्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आणले नाही. पण पंतप्रधान मोदींनी आणलं. पंतप्रधान मोदी देशाला आत्मनिर्भर भारत बनवणार, समृद्ध करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे 400 खासदार निवडून येणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

‘सिंधुदुर्गाचं डरडोई उत्पन्न वाढवणार’

नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, ‘देशात सर्वात जास्त डरडोई उत्पन्न हे गोवा राज्याचं आहे. कारण गोवा राज्य हे पर्यटनावर अवलंबून आहे. त्यांच्या बरोबरीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डरडोई उत्पन्न झाले पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील तरुणांनी काम करायला हवं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीकोनातून काम करायला हवं.’ 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  दोडामार्गमधील आडाळी एमआयडीसी सुरू व्हावी यासाठी स्थानिकांनी दोन दिवसांपूर्वी लाँग मार्च काढला होता. यावर देखील नारायण राणे यांनी टीका केली आहे. ‘सरकार विरोधात लाँग मार्च होता तर इथल्या लोकप्रतिनिधींशी बोलायला हवं होतं. मला सांगितलं असतं तर मी प्रश्न सोडवण्यास मदत केली असती’, असं नारायण राणे म्हणाले आहेत. 

यावेळी बोलतांना नारायण राणे यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर देखील टीका केली आहे. ‘देशांत 36 देश एकत्र येऊन काही होणार नाही’, असं राणेंनी म्हटलं आहे. 

हेही वाचा : 

शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसनं नाहीतर, देवेंद्र फडणवीसांनी काढावा; विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य

[ad_2]

Related posts