IPhone 15 Will Reduce Transfer Speed With USB-C What Is The Real Reason Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 Iphone 15 : आयफोनचे क्रेझ तरूणांमध्य मोठ्या प्रमाणात आहे. आता सर्वजण Iphone 15 ची  वाट पाहत आहेत. पुढील महिन्यात Apple  iPhone 15 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्या, iPhone 15 च्या USB-C केबलबद्दल नवीन बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आयफोन 15 यूएसबी-सीसह ट्रान्सफर स्पीड कमी करणार.  ही 1.6 मीटर (5.24 फूट) लांबीची ब्रँडेड केबल आहे जी USB PD 3.0 ला सपोर्ट करते. डेटा ट्रान्सफर गती USB 2.0 (480 Mbps) पर्यंत मर्यादित आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने यूएसबी टाइप-सी केबलचे फोटोज शेअर केले आहेत. यात सांगितले गेले आहे की, या केबलची लांबी  1.6 मीटर आहे. आयफोन 15 सह दिलेली केबल USB 2.0 कनेक्टिव्हिटी आणि 20v सपोर्टसह येईल. त्याचा डेटा ट्रान्सफर स्पीड 480Mbps असेल. आयफोन 15 USB 4 आणि थंडरबर्ड केबल्सपेक्षा कमी चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरकरता चांगला स्पीड मिळेल. यात रेटिमर चिप मिळेल जी साधारण हाय-स्पीड डेटा ट्रान्समिशन उपकरणांमध्ये आढळते. आगामी फोन 40Gbps पर्यंत डेटा ट्रान्समिशन स्पीड देऊ शकेल.

35W चार्जिंग सपोर्ट 

आयफोन 15 मॉडेल नवीन यूएसबी टाइप-सी पोर्टवर 35W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. iPhone 14 Pro सध्या 27W चार्जिंगसाठी सपोर्ट करते. हा स्पीड कोणत्याही  iPhone पेक्षा सर्वात जास्त आहे. सप्टेंबरमध्ये लॉन्च होणाऱ्या iPhone 15 मध्ये ड्युअल USB पोर्टसह 35W अडॅप्टर किंवा 30W MacBook Air अडॅप्टर देण्यात येऊ शकते.

Iphone 15 फिचर्स

आयफोन 15 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले असणार आहे. आयफोन मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड स्टाइलचा डिस्प्ले असेल जो सध्या प्रो मॉडेल्सपुरता मर्यादित आहे. कार्यक्षमतेच्या बाबतीत आयफोन 15 खूप अपग्रेडेड व्हर्जन आहे. आगामी आयफोन 15 हा A16 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. आयफोन 15 मध्ये 48 मेगापिक्सलच्या इमेज सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सिस्टीम आहे तर आयफोन 15 देखील चांगला बॅटरी बॅकअप देतो. आयफोन 15 कंपनी डार्क ब्लू, पिंक, स्काय ब्ल्यू आणि क्रिमसन रेड कलर पर्यायांसह लॉन्च केला जाऊ शकतो. हा 60 हर्ट्झ रिफ्रेश दर 20 व्हॅट्स चार्जिंगच्या सपोर्टसह येऊ शकतो. हे 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येऊ शकते. 9to5Mac च्या अहवालानुसार, जर आयफोन 13 सप्टेंबर रोजी बाजारात आला तर कंपनी प्री-आर्डर 15 सप्टेंबरपासून सुरु करु शकते. मोबाईल फोनची विक्री 22 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

WhatsApp : आता फोटोंव्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवर HD व्हिडीओही शेअर करता येणार; यूजर्सना हे 2 पर्याय मिळतील

[ad_2]

Related posts