[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुलुंडमधील देवळात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
निमीश भिंडे हे व्यवसायिक असून त्यांचे मोबाईलचे दुकान होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमीश मुलुंड येथील एलबीएस मार्गावर असलेल्या बाल राजेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
श्रावणातील उपवास सोडायच्या आधी ते संध्याकाळी देवाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, पावसात भिजल्यामुळं ते थोडे ओले झाले होते. आणि मंदिरातील जमीनदेखील ओली होती. त्याचवेळी अंगावरील ओले कपडे सुकवण्याच्या हेतूने त्यांनी मंदिरातील टेबल फॅन स्वतःकडे सरकवण्याचा प्रयत्न केला.
टेबल फॅन स्वतःकडे वळवत असतानाच त्याला जोरदार विजेचा झटका लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. मंदिरात कुठे लिकेजचा इश्यू होता का किंवा अर्थिंगचा प्रोब्लेम आहे का हे शोधण्यात येईल.
निमीषच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा
अंधेरीतील फुटलेली पाईपलाईन दुरुस्त, पाणीपुरवठा पूर्ववत
शिक्षकी पेशाला काळीमा! ४ शाळकरी मुलींचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण
[ad_2]