India vs Pakistan Cricket Math Date, Time And full Information One One Click ; आशिया चषकापूर्वी भारत-पाकिस्तान भिडणार, कुठे आणि किती वाजता होणार सामना जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबरला रंगणार आहे. पण त्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेचटच्या मैदानात आमने सामने येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता होणार आहे, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे महायुद्ध असते. त्यामुळे या सामन्याला जगभरात मोठा प्रतिसाद असतो. त्यामुळे सर्वांनाच आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेमका कधी होतो, याची उत्सुकता लागलेली होती. पण आता त्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी २६ ऑगस्ट या दिवशी आयबीएसए वर्ल्ड गेम्सच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारताचा अंतिम फेरीत मुकाबला हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
उपांत्य फेरीत भारताने नेमका कसा विजय मिळवला, जाणून घ्या…
भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघाने शुक्रवारी बांगलादेशचा ७ विकेट्स राखून पराभव करून आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा महासंघ आयोजित वर्ल्ड गेम्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड गेम्सच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशला २० षटकात ६ बाद १४४ पर्यंत रोखले आणि नंतर १८ चेंडू बाकी असताना लक्ष्याचा पाठलाग केला. शनिवारी अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या आठवड्यात, जेव्हा दोन्ही संघांनी जागतिक क्रीडा मोहिमेला सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. भारत आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशने पहिल्या नऊ षटकांत २ बाद ६२ अशी चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली आणि बांगलादेशच्या फलंदाजांना हात उघडू दिला नाही. बांगलादेशकडून चांगली फलंदाजी करणारा आशिकुर रहमान 13व्या षटकात धावबाद झाला आणि त्यांची ३ बाद ८८ अशी अवस्था झाली. त्यानंतर एम आरिफ हुसेन आणि एस इस्लाम यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि ५६ धावांची भागीदारी केली. भारताने बांगलादेशला यावेळी १५० धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही आणि शेवटच्या षटकात तीन विकेट घेत बांगलादेशला १४४ धावांपर्यंत रोखले. १४५ धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीचा धक्का बसला. कारण भारतीय संघाने तिसर्‍याच षटकात फक्त १७ धावा असताना त्यांची पहिली विकेट गमावली. यानंतर सुनील रमेश आणि नरेशभाई बाळूभाई तुमडा यांनी ६८ धावांची भागीदारी करत भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. भारताच्या १० षटकांत २ बाद ९० अशी धावसंख्या होती आणि शेवटच्या १० षटकांत त्यांना आणखी ५५ धावांची गरज होती. एनबी तुमडा आणि दुर्गा राव टोमपाकी यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि भारताने १७ षटकांत लक्ष्य गाठले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

दरम्यान, भारतीय महिला अंध संघही अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून शनिवारी एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेतेपदाचा सामना होणार आहे.

[ad_2]

Related posts