Pune Crime News Drinking Alcohol At A Party Repeatedly Raped By Threatening Nude Photo Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात गुन्हेगारीत (Crime) वाढ होत (Pune crime) आहे. त्यात अत्याचारांच्या घटनांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक तरुणांचा कल दिसत आहे. यातच पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन तरुणीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं आहे. आधी तरुणीला दारु पाजली त्यानंतर त्रास होत असल्याने तिला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे विश्वास नेमका कोणावर ठेवावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सगळ्यानंतर या मुलाने तरुणीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकीदेखील या तरुणाने दिली. त्यानंतर हिच धमकी आणि फोटो दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. या प्रकरणी तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिषेक सत्तुजी टिक्कल या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जुलै 2022 मध्ये तरुणीला पार्टीसाठी विमाननगर येथील ईफिनगट क्लबमध्ये बोलावून घेतलं होतं. याच पार्टीत तिला दारु पिण्यासाठी आग्रह केला होता. त्यानंतर तरुणीने  दारु प्यायला नकार दिला. मात्र जबरदस्तीने आग्रह करुन दारु पिण्यास लावली. त्यानंतर नशेत या तरुणीला  लेमन ट्री हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि व्हिडीओ, फोटोदेखील काढले.

पुण्यात मागील काही दिवसांपासून अत्याचारात चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे. काल अशीच एक घटना समोर आली होती.  लहानपणीच्या मित्रानेत एका तरुणीसोबतच्या मैत्रीचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं होतं. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. हा प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला सून पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चंदननगर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख  (वय-26 रा. मुपो. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार एक दोन दिवस नाही तर जुलै 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत वाघोली येथील हॉटेलमध्ये घडला होता आणि सोबतच आरोपीच्या भावाच्या घरी घडला देखील होता. 

इतर महत्वाची बातमी-

[ad_2]

Related posts