Budh Margi Mercury will be the giver of business luck of these zodiac signs will shine get more money

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mercury Planet Margi In Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक वेळी त्यांची रास बदलतात. यावेळी काही ग्रह हे मार्गी देखील होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येतो. काही दिवसांपूर्वी बुध, बुद्धी आणि व्यवसायाचा दाता वक्री झाले होते. तर आता सप्टेंबरमध्ये मार्गी होणार आहेत. बुधाच्या मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

बुध मार्गीचा या राशींच्या व्यक्तींना होणार फायदा

धनु रास (Dhanu Zodiac)

बुध ग्रहाचा हा बदल धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. बुध ग्रह तुमच्या राशीतून थेट नवव्या घरात जाणार आहे. या काळात विवाहित व्यक्तींना यावेळी त्यांच्या जीवनसाथीची साथ मिळणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. तुमच्या कुटुंबात सुख परत येईल.

वृषभ रास (Taurus Zodiac)

सिंह राशीमध्ये बुधाचं संक्रमण तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीतून थेट चौथ्या घरात जाणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकणार आहेत. या काळात तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात. मुलांच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थी विजयी होऊ शकतात. 

कर्क रास (Cancer Zodiac)

बुध ग्रहाचे संक्रमण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकते. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. या कालावधीत विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतात. तुमचे मोठ्या लोकांशी संबंध बनू शकतात. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात तुम्ही यावेळी बचत करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ शुभ आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts