Temperature on the Moon : चंद्राच्या मातीखाली 8 सेंटीमीटर खोलीत उणे 10 अंश सेल्सिअस तापमान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आता बातमी चंद्रावरुन.. खरंतर, &nbsp;बातमी आहे मुंबईतून, बातमी आहे दिल्लीतून… अशी वाक्य ऐकण्याची तुम्हा-आम्हाला सवय आहे. मात्र आपल्या शास्त्रज्ञांनी जी कामगिरी केलीय, त्यामुळे आता थेट चंद्रावरूनच बातम्या येऊ लागल्यायत… भारताचं विक्रम लॅण्डर सध्या चंद्रावर आहे. तेच या बातम्या आपल्याला पुरवतंय. चंद्रावरील फोटो, व्हिडीओ पाठवल्यानंतर लॅण्डरने आता चंद्रावरील तापमानाचे आकडे पाठवले आहेत. चास्ते या उपकरणाच्या मदतीने मोजलेल्या तापमानानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर १ सेंटीमीटर उंचीवर ५६ अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय. तर, पृष्ठभागाच्या खाली ८ सेंटीमीचर खोलीदरम्यान उणे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दरम्यान, चंद्रावरील तापमान समजल्यामुळे, लॅण्डरच्या अचूक कामगिरीची माहिती मिळाली आहेच, मात्र या माहितीमुळे भविष्यातील मोहिमांसाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts