Tamil Nadu Police Filed Fir On Bjp It Cell Chief Amit Malviya On Complaint Of Dmk About Udhayanidhi Stalin Sanatana Dharma Remark

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Udhayanidhi Stalin Sanatana Dharma Row: डीएमके (DMK) पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या वक्तव्या प्रकरणी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. डीएमकेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, अमित मालवीय (Amit Malviya) यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत जे म्हटलं होतं त्याचा विपर्यास करून सोशल माध्यमांवर पोस्ट केलं आहे. या तक्रारीवरून तामिळनाडूच्या त्रिची पोलिसांनी बुधवारी (6 सप्टेंबर) अमित मालवीय यांच्याविरुद्ध कलम 153 अ, 504, 505 1 (बी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत होतं. त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. यावरुन देशभरात चर्चांना उधाण आलं होतं. 

अमित मालवीय यांनी काय केली पोस्ट?

डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर शनिवारी (2 सप्टेंबर) अमित मालवीय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचा ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी असंही लिहिलं होतं की, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडला आहे. केवळ विरोध न करता ते नष्ट केलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे.”

विरोधकांच्या इंडिया आघाडीलाही लक्ष्य केलंय 

अमित मालवीय यांनी पुढे लिहिलं की, “थोडक्यात, ते सनातन धर्माचे पालन करणार्‍या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराची हाक देत आहेत. द्रमुक हा विरोधी पक्ष इंडिया आघाडीतील प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळचा सहयोगी आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत यावर एकमत झालं होतं.”

उदयनिधी स्टॅलिन यांनी वाढत्या वादावर स्पष्टीकरण दिलं

सनातन धर्मावरील या टिप्पणीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनीही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले होते, “मी कधीही सनातन धर्माच्या अनुयायांच्या नरसंहाराची हाक दिलेली नाही. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली आहे आणि सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, असं मी वारंवार सांगेन. भाजपचे काम खोट्या बातम्या पसरवणं आहे. आणि ती माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे.”

काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे. 

उदयनिधी स्टॅलिन वक्तव्यावर ठाम

उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका  झाल्यानंतर त्यांनी आपल्या  वक्तव्यावर  ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं, सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना न बोलावणं, हे सनातन धर्माचं उत्तम उदाहरण : उदयनिधी स्टॅलिन

[ad_2]

Related posts