[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता आशिया चषक स्पर्धेत पूर्ण होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा २ सप्टेंबरला होणार आहे. भारताचा हा पहिला सामना असेल. पण पाकिस्तानचा मात्र या स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. कारण पाकिस्तानचा या स्पर्धेतील पहिला सामना हा ३० सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान यांच्यासह श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. पण आशिया चषकातील सामने सकाळी नाही तर दुपारी सुरु होणार आहेत.
आशिया चषकातील सामन्यांसाठी पंच हे दुपारी १.३० वाजता पाहणी करतील. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरून सरान करू शकतात. जर पाऊस नसेल किंवा पावसामुळे मैदान ओले नसेल तर दुपारी २.३० वाजता टॉस करण्यात येईल. टॉस झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू सामन्याच्या तयारीला लागतील. टॉसनंतर काही वेळात दोन्ही संघ दाखल होतील. टॉसनंतर अर्ध्या तासाने म्हणजे दुपारी ३.०० वाजता आशिया चषकातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. जर कोणताही अडथळा आला नाही तर हा सामना साधारण आठ तास सुरु राहील. त्यामुळे हा सामना साधारणपणे रात्री ११.०० च्या सुमारास संपू शकतो. त्यामुळे आता चाहत्यांसाठी दुपारी २.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत आशिया चषकाच्या सामन्याची मेजवानी असेल.
आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन (राखीव खेळाडू).
[ad_2]