Agriculture News Climate Change Causes A Drop In Farmers Revenue According To This Survey

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agriculture News : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं नवनवीन संकटांना सामोरं जावं लागतं. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. वातावरणातही सातत्यानं बदल होतं आहेत, यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमी होत असल्याचे ‘फार्मर व्हॉईस’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हवामान बदलामुळं गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सरासरी 15.7 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच या कालावधीत सहापैकी एका शेतकऱ्याचे उत्पन्न 25 टक्क्यांपर्यंत नुकसान झालं आहे.

सर्वेक्षणातील माहितीनुसार 71 टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळं त्यांच्या शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. भविष्यात शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामामुळं बहुतेक शेतकरी चिंतेत आहेत. 73 टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, कीटकनाशके आणि पिकावरील रोगांमुळे त्यांच्यावर अधिक दबाव येत आहे. ‘फार्मर व्हॉईस’ सर्वेक्षणाने जगभरातील शेतकऱ्यांना हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आणि भविष्याची तयारी करताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते हे समोर आले आहे.

हवामान बदलामुळं शेतीमध्ये निर्माण होणारी आव्हाने कायम

बायर लाइफ सायन्स कंपनीने जगभरातील 800 शेतकऱ्यांचे ‘फार्मर व्हॉइस’ सर्वेक्षण केले. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, जर्मनी, भारत, केनिया, युक्रेन आणि यूएस मधील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. हवामान बदलामुळं शेतीमध्ये निर्माण होणारी आव्हाने भविष्यातही कायम राहतील, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावरील तीन चतुर्थांश शेतकऱ्यांनी सांगितले की, हवामान बदलाचा त्यांच्या शेतीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. भारत आणि केनियातील शेतकरी यामुळं अधिक चिंतेत होते.

हवामान बदलामुळे जागतिक अन्नसुरक्षेला धोका 

बायर एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि पीक विज्ञान विभागाचे अध्यक्ष रॉड्रिगो सँटोस यांनी म्हटले आहे की, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना शेतीवर विपरीत परिणाम होत आहेत. याशिवाय या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्यांचा आवाज समोर आणणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्वेक्षणात हवामान बदलामुळे जागतिक अन्नसुरक्षेला धोका असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. वाढती जागतिक लोकसंख्या लक्षात घेता, सर्वेक्षणाचे परिणाम पुनरुत्पादक शेतीसाठी उत्प्रेरकांना मदत करतील. हवामान बदलाचा मोठा परिणाम होऊ शकतो. पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही परिसरात जास्त पाऊस, तर काही परिसरात कमी पाऊस पडू शकतो. यामुळे कुठं ओला पडले तर कुठे कोरडा दुष्काळ पडतो. समुद्रातील पाण्याची पातळी वाढते.

महत्त्वाच्या बातम्या:

Climate Change : हवामान बदलाचा भारतीय उपखंडावर परिणाम, भयंकर चक्रीवादळासह तापमानातही मोठी वाढ 

[ad_2]

Related posts