[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुढच्या काही तासांसाठी हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३-४ तासांमध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा, अशा सूचना मुंबई आयएमडीकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. नाशिक, धुळे जिल्ह्यांमध्येही पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सव सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज नक्की घ्यावा.
पालघर जिल्ह्यालाही पुढच्या काही तासांसाठी सोसायटीच्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निर्जन ठिकाणी थांबू नये, अशाही सूचना मुंबई आयएमडीकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
अनंत चतुर्दशीला ‘या’ वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन
मुंबईकरांनो लक्ष द्या! हवामान विभागाकडून येलो अलर्ट जाहीर
[ad_2]