Asia Cup 2023 Live Streaming On Star Sports And Disney Hotstar ; आशिया कप २०२३ चे लाइव्ह सामने नेमके कुठे पाहायला मिळतील, जाणून घ्या योग्य चॅनेल…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धा आता एका दिवसावर येऊन ठेपली आहे. ३० ऑगस्टला पाकिस्तानच्या सामन्याने आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पण आशिया चषकातील सामने नेमके कोणत्या चॅनेलनवर पाहता येणार, याची माहिती आता समोर आली आहे.

आशिया चषक स्पर्धेची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. पण आशिया चषकाचे सामने नेमके कुठे पाहता येतील, याची माहिती मात्र समोर आली नव्हती. पण आशिया चषकातील सामन्यांचे Live Streaming नेमके कुठे होणार आहे, याची माहिती आता समोर आली आहे. आशिया चषकातील सर्व सामन्यांचे टॉस हे दुपारी २.३० मिनिटांनी होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी ३.०० वाजता भारतीय वेळेनुसार हे सामने सुरु होतील. पण हे सामने नेमके कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळतील, याची माहिती आता समोर आली आहे.

आशिया चषकातील सामने टीव्ही आणि अॅपवरही पाहायला मिळणार आहेत. आशिया चषकातील सर्व सामने हे स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. दुपारी २.०० वाजल्यापासून या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण Star Sports वर पाहायला मिळतील. त्याचबरोबर Disney+ Hotstar वरही हे सामने लाइव्ह पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आशिया चषकाचा आनंद आता चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहे. आशिया चषकातील सामने हे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांत होणार आहेत. पण भारताचे सर्व सामने मात्र श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. कारण भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला आहे. पण आशिया चषकातील सामन्यांसाठी बीसीसीआयकडून अध्यक्ष रॉजर बिन्नी जाणार असल्याचे आता समोर आले आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानबरोबर २ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर या स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना हा नेपाळच्या संघाशी होणार आहे. या साखळी फेरीनंतर स्पर्धेत सुपर-४ खेळवण्यात येणार आहे. या फेरीत दोन्ही गटांतील अव्वल चार संघ दाखल होतील. आशिया चषक स्पर्धा ही ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन (राखीव खेळाडू).

[ad_2]

Related posts