[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जिम मेंबरशिप
आजकाल मुली घर-ऑफिससोबतच त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेत आहेत. जर तुमची बहीण देखील फिटनेस फ्रिक असेल तर या रक्षाबंधनाला, तिला जिम मेंबरशिप देऊन आनंदित करा. आजकाल बहुतेक जीममध्ये चांगली पॅकेजेस चालू आहेत, सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूटही मिळू शकते.
(वाचा :- Foods To Live 100: जपानमध्ये हे 7 पदार्थ खाऊन 100 वर्ष आयुष्य जगतात लोक, भारतात 10 रूपये किलोने मिळतो पाचवा पदार्थ)
हेल्दी स्नॅक्स
या रक्षाबंधनात, दुकानातील मिठाई खाणे टाळा आणि इतरांनाही देऊ नका. मिठाई फक्त चव देते पण आरोग्याला काहीच फायदा देत नाही. जर तुम्हाला तुमच्या बहिणीची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करायची असेल तर, फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स, बदाम, काजू, अक्रोड इत्यादीसारखे हेल्दी स्नॅक्स खरेदी करा. तुमच्या लाडक्या बहिणीसाठी यापेक्षा चांगली भेट कोणती असू शकते?
(वाचा :- वयाच्या 20 मधील तरूणांना का येतायत मेजर Heart Attack?, ही एक चुक पडतेय प्रचंड महागात, तुम्हीही थांबवा नाहीतर..)
रनिंग शूज
जर तुमच्या बहिणीला फिटनेसची खूप काळजी असेल तर तिला अगदी डोळे मिटून बिनधास्त रनिंग शूज एक जोडी भेट द्या. बघा ती तुमच्यावर किती खुश होईल. रनिंग शूजचे बरेच ब्रँड आहेत, जे हलके आणि दर्जेदार असतातव खूप कम्फर्ट देतात. विश्वास ठेवा, कोणत्याही महागड्या गॅझेटपेक्षा हे एक बेस्ट गिफ्ट ठरेल.
(वाचा :- 200 पार डायबिटीज अन् कोलेस्ट्रॉलचा झाला असेल स्फोट तर तोंडात दाबून ठेवा हा पदार्थ, झटक्यात बाहेर पडेल सर्व घाण)
फिटनेस स्मार्टवॉच
जर तुमच्या बहिणीला स्मार्टवॉचची आवड असेल तर तिच्यासाठी यापेक्षा चांगले गिफ्ट काय असू शकते. तुम्ही तिला महागड्या ब्रँडचे घड्याळ दिलेच पाहिजे असे नाही, परंतु असे अनेक ब्रँड्स ऑनलाइन आहेत जे बजेटमध्ये असे स्मार्टवॉच विकतात. यामुळे तिला रक्तदाब, चालणे, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन आणि तणाव पातळी इत्यादींचे निरीक्षण करण्यास मदत होऊ शकते.
(वाचा :- या काळ्या पदार्थामुळे सकाळी अंथरूणातून उठल्या उठल्या पोट होतं मुळापासून साफ, एका तुकड्यापुढे लाखोंची औषधंही फेल)
हर्बल टी किट
जर तुमची बहीण लठ्ठपणाशी झुंजत असेल तर यावेळी तिला हर्बल टी किट भेट द्या. ग्रीन टी, मिंट टी, बेसिल टी, हिबिस्कस टी, अश्वगंधा टी इत्यादी अनेक प्रकारचे हर्बल टी किट बाजारात उपलब्ध आहेत. असे मानले जाते की याच्या नियमित सेवनाने हेल्दी मार्गाने वजन कमी करण्यास मदत होते.
(वाचा :- ही 5 फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, पोटात बनेल भयंकर अॅसिड, जळून जातील आतडी, पचनक्रिया होईल कायमची बंद)
हेल्थ चेकअप
या सगळ्या व्यतिरिक्त, जर तुम्हाला तुमच्या बहिणीला सर्वात मोठी आणि उपयुक्त भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही तिच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात तिला मदत करा. आजकाल अनेक कंपन्या घरोघरी नमुने गोळा करून अहवाल पाठवतात. बीपी, रक्तातील साखर, शरीरातील चरबी, स्तन तपासणी, हाडांची तपासणी, पोट तपासणी, एसटीडी, मानसिक आरोग्य, फुफ्फुसांची तपासणी, त्वचा तपासणी इत्यादी काही चाचण्या महिलांसाठी आवश्यक आहेत.
(वाचा :- लठ्ठपणाने नाही मेटाबॉलिज्मने फुगतात पोट, मांड्या, हिप्स, घरात 12 महिने असलेली ही पानं जाळतात चरबीचा एकन् एक हिस्सा)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]