मुंबई, ठाणे, पालघरमध्ये १ सप्टेंबरपर्यंत 'असा' असेल पावसाचा अंदाज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये शुक्रवार, १ सप्टेंबरपर्यंत हलक्या सरींचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवातीला पावसाची शक्यता आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांची उष्णतेपासून सुटका झाली आहे.

ढगाळ वातावरण असल्यामुळे मंगळवारी संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

रविवार, 27 ऑगस्ट ते सोमवार सकाळ, 28 ऑगस्ट दरम्यान, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेत 23 मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबा वेधशाळेत 14 मिमी पावसाची नोंद झाली. 

26 ऑगस्ट रोजी, शहरात या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली, सांताक्रूझ हवामान केंद्रात 44.6 मिमी पावसाची नोंद झाली आणि कुलाबा किनारपट्टी वेधशाळेत 10.2 मिमी पाऊस झाला.

मान्सूनच्या पुनरुज्जीवनामुळे ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाचे प्रमाण 100 मिमीच्या पुढे गेले आहे. याउलट, शहरात जुलैमध्ये 1,769.8 मिमी पावसाची नोंद झाली, जी महिन्यातील 855.7 मिमी पावसाच्या दुप्पट होती.

दुसरीकडे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी बुधवार, 30 ऑगस्टसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

पावसाची सरासरी ६० टक्क्यांनी घसरली

<h1 class="push-half–bottom text-capitalize ml-font-black ml-story-pos" data-href="https://www.mumbailive.com/mr/civic/high-tide-alert-for-5-days-in-mumbai-4.5-meter-high-waves-will-rise-80550" data-title="High Tide In <a href=" https:="" mumbailive.com="" mr="" tag="" mumbai”=”” target=”_blank”>Mumbai : समुद्र उसळणार! मुंबईच्या समुद्राला 5 दिवस मोठी भरती”>High Tide In Mumbai : समुद्र उसळणार! मुंबईच्या समुद्राला 5 दिवस मोठी भरती

[ad_2]

Related posts