Whatsapp Launch News App Mac Users Support 8 And 32 People Video And Audio Calls Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

New WhatsApp App For Mac : WhatsApp एक सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म आहे. यात अनेक बदल युजर्सकरता केले जातात. विविध फिचर्स युजर्सकरता दिले जातात. आता पुन्हा एकदा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी Mac युजर्ससाठी एक नवी घोषणा केली आहे.

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप (Messaging App) असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने Apple च्या मॅकसाठी एक अ‍ॅप (App) लॉन्च केले आहे. कंपनीने हे अॅप लाँच करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर अ‍ॅप्सपैकी एक असलेल्या झूमशी स्पर्धा करणे आहे. या नवीन अॅपच्या साहाय्याने यूजर्सना एकाच वेळी 8 जणांना व्हिडीओ काॅलमध्ये तर 32 लोकांना ऑडीओ काॅलमध्ये सामील करता येणार आहे. व्हॉट्सअॅप अॅप फॉर मॅक (WhatsApp App For Mac) पहिल्यांदाच ग्रुप व्हिडीओ कॉलिंगला सपोर्ट करेल. WhatsApp ची जुनी आवृत्ती सुरूवातीस व्हिडीओ आणि ऑडीओला Mac युजर्ससाठी सपोर्ट करत नव्हते.

मॅकवर WhatsApp कसे डाऊनलोड करायचे?

  • सर्वात पहिल्यांदा व्हॉट्सअ‍ॅपच्या वेबसाईटवर जावे.
  • वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करावे.
  • तुम्हाला डाऊनलोडसाठी तीन पर्याय दिसतील. अँड्राॅईड , iOS आणि मॅक.
  • यातील मॅक पर्यायाखाली असलेल्या डाऊनलोड बटणावर क्लिक करावे.
  • डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोडिंग सुरू होईल. ते पूर्ण झाल्यानंतर फाईलवर क्लिक करावे.
  • तुमच्या अ‍ॅप्लिकेशन फोल्डरमध्ये हिरवी व्हॉट्सअ‍ॅप फाईल ड्रॅग आणि ड्रॉप करावी.
  • त्यानंतर तुम्ही WhatsApp अ‍ॅप पाहण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन फोल्डर उघडू शकता.
  • ते चालवण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
  • सुरुवात करण्यासाठी तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करावे किंवा एक नवीन अकाउंट सेट करावे.
  • मॅकसाठी अधिकृत WhatsApp अ‍ॅप आता अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

WhatsApp या फिचरवर करत आहे काम

WhatsApp अनेक फिचरवर काम करत आहे. त्यामध्ये  यूजरनेम, अॅडमिन रीव्ह्यू, Passkey, ईमेल लिंक इत्यादीचा समावेश आहे. युजरनेम फीचर सुरू केल्यानंतर, प्रत्येकाला स्वतःचे वेगळे युजरनेम सेट करावे लागेल, जसे सध्या इंस्टाग्राम आणि ट्विटरमध्ये आहे. युजरनेमच्या मदतीने तुम्ही इतरांनाही तुमच्या व्हॉट्सअॅपवर जोडू शकता. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा इतरांना नंबर देण्याची गरज नाही. WhatsApp व्यतिरिक्त, Meta ने थ्रेड्ससाठी नवीन अपडेट्स देखील जारी केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या : 

What Is Jio AirFiber : जिओ एअरफायबर म्हणजे आहे तरी काय? किती असणार शुल्क? जाणून घ्या फीचर्स आणि इतर माहिती…

[ad_2]

Related posts