[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Super Blue Moon In India: आकाशात आज दुर्मिळ सुपर ब्लू मूनचं (Super Blue Moon) दर्शन झालं, ही एक अनोखी आणि आश्चर्यकारक घटना होती. देशभरातील विविध शहरांत आज सुपर ब्लू मून दिसला. बिहार आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागात चंद्राचं (Moon) हे दृश्य पाहायला मिळालं. यानंतर पुढील ब्लू मून 2026 मध्ये दिसणार आहे.
बिहारच्या पाटणामध्ये दिसलेल्या सुपरमूनचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये चंद्र खूप तेजस्वी आणि सुंदर दिसत आहे. याशिवाय आज बरंच काही बघण्यासारखं आहे, आज शनिचंही दर्शन होणार आहे. मुंबईतही आज सुपर ब्लू मूनचं दर्शन झालं.
VIDEO | Visuals of Super Blue Moon from Patna, Bihar.#supermoon #SuperBlueMoon #SUPERBLUEMOON2023 pic.twitter.com/5u3l7mYiFD
— Press Trust of India (@PTI_News) August 30, 2023
शनिचंही होणार दर्शन
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या म्हणण्यानुसार, रात्री शनि चंद्राभोवती वर्तुळात फिरत असल्यासारखं दिसेल. तर सुपर ब्लू मूनचं (Super Blue Moon) दर्शन 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत कायम राहणार आहे.
सुपर ब्लू मून पाहण्याची सर्वोत्तम वेळ गुरुवारी पहाटेनंतरची असली तरी, बुधवारी (30 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास चंद्र सर्वात उजळ दिसला आहे.
काय आहे सुपर ब्लू मून?
आज पूर्ण चंद्र, सुपरमून आणि ब्लू मून या तिन्ही खगोलीय घटना एकत्र घडत आहेत. याला ‘सुपर ब्लू मून’ म्हणतात. खगोलशास्त्रज्ञ सुपर मून, ब्लू मून अशा संज्ञा वापरतात कारण ही एक क्वचित घडणारी घटना आहे. ऑगस्ट 2023 हा असा महिना आहे, जेव्हा पौर्णिमा दोनदा येते, 1 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट. हे फार क्वचितच घडतं, जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असतात. खरं तर पौर्णिमा ही महिन्यातून एकदाच येते. शास्त्रज्ञांनी 1 ऑगस्टच्या पौर्णिमेला सुपर मून म्हटलं आहे आणि 30 ऑगस्टच्या पौर्णिमेला ब्लू मून म्हटलं आहे. यानंतर पुढील ब्लू मून 2026 मध्येच दिसेल.
सुपर ब्लू मून पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
30 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 च्या सुमारास ब्लू मून अधिक उजळ दिसणार होता. याशिवाय 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास सुपर ब्लू मून अत्यंत उजळ दिसेल.
सुपरमून दरम्यान चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि उजळ दिसतो. सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, जी चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा घडते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने तो आकाराने मोठा आणि उजळ दिसतो.
हेही वाचा:
[ad_2]