A Two-hour Block On The Pune-Mumbai Expressway Tomorrow For Work On The ITMS System

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती (Mumbai – Pune Expressway) मार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी द्रुतगती मार्ग इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अर्थात आयटीएमएस उभारण्याचं जाहीर करण्यात आलं. याचाच भाग म्हणून उद्या सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केली जाणार आहे. यासाठी उद्या द्रुतगती मार्गावर 12 ते 2 असा विशेष ब्लॉक घेतला जात आहे. या दोन तासांत ओव्हरहेड ग्रॅंटी बसवली जाईल. याच ग्रॅंटीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील आणि हेच सीसीटीव्ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या लेनवर लोणावळा एक्झिट जवळ ग्रॅंटी बसविण्यात येईल. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे. तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाईल. 

काय आहे ITMS सिस्टिम?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी तब्बल 370 विविध कॅमेरे तैनात असतील. या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

ITMS – इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळं होणारा फायदा

– वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
– यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील. 
– ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
– सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
– अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
– अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
– अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.

इतर महत्त्वाची बातमी-

Pune-mumbai Express Highway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात का होतात? ‘या’ कारणांमुळे हा मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

 

 

 

[ad_2]

Related posts