The Number Of Accidents In Pune City Will Increase By 113 Per Cent From 2020

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात आणि पिंपरी- चिंचवड (Pune PCMC Accident news) अपघाताचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. त्यामुळे अनेकांना जीवही गमावावा लागला आहे. पुणे शहरात 2020 पासून अपघातांच्या (Accident news) संख्येत सुमारे 113 टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आता अपघातांवर उपाययोजना करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे.  अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट)  (Black spot)अपघातांची कारणे आणि त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात, त्यासाठी संबंधित महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी दिले आहेत.

पुणे शहरात सर्वाधिक अपघात होतात. रस्ते अपघात माहिती प्रणाली अर्थात ‘आयरॅड’ वरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करुन अपघातांची कारणं आणि त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी करायच्या सर्व उपाययोजना निश्चित कराव्यात. आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग्ज, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स हे उपाय योजण्यात यावेत. यासाठी ब्लॅकस्पॉट निहाय संयुक्त सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविण्यात याव्यात. सर्वेक्षणासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे, असेही देशमुख म्हणाले.

अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या परिसरात ‘108- रुग्णवाहिका सेवेतील रुग्णवाहिकांची स्थायी थांब्याची ठिकाणे ठरविणे, रुग्णालयात लवकरात लवकर अपघातग्रस्तांना पोहोचविण्याच्यादृष्टीने आपत्कालीन वाहतूक आराखडे तयार करणे यादृष्टीने कार्यवाही करावी, या सूचनाही यावेळी डॉ. देशमुख यांनी दिल्या. पुणे जिल्ह्यात 63 ब्लॅक स्पॉट्स आहेत असे यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवले पूल येथील अपघात कमी करण्याच्यादृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितल. त्याचप्रमाणे पुणे अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्गावरही उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं.

पुणे शहरात सन 2020 पासून अपघातांच्या संख्येत सुमारे 113 टक्क्यांची वाढ झाल्याचे, त्यातही दुचाकी चालवणारे आणि पादचाऱ्यांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यादृष्टीने हेल्मेटच्या वापराविषयी अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.

ही बातमी वाचा-

Pune news : इंदापूरातील विकास करताना स्थळांचं ऐतिहासिक सौंदर्य जपा; अजित पवारांच्या सूचना

 

 

 

[ad_2]

Related posts