Danielle McGahey First Transgender To Play International Cricket Canada Squad Womens T20 World Cup Qualifier 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

First Transgender Cricketer: कॅनडाची डॅनिअल मॅकगेई (Danielle McGahey) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंती खेळाडू होणार आहे. डॅनिअल कॅनडाच्या संघातून बांगलादेशविरोधात मैदानात उतरणार आहे.  क्रिकेटच्या इतिहासातील हा एक सर्वात मोठा क्षण असेल. 

कॅनडा आणि बांगलादेश महिला संघामद्ये 2024 च्या टी 20 विश्वचषकासाठी क्वालीफायर सामना होणार आहे. क्वालिफाय सामने लॉस एंजिलिसमध्ये  4 ते 11 सप्टेंबरदरम्यान होणार आहेत.  कॅनडाच्या संघात डॅनिअल या तृतीयपंथीला स्थान दिलेय. 29 वर्षीय डॅनियल हिला कॅनडाच्या संघात स्थान दिलेय. डॅनिअल हिने पुरुष ते महिला ट्रांसजेंडर खेळाडूंच्या सर्व नियमांत उतीर्ण झाली आहे.  

विश्वचषकात क्वालिफायर करण्यासाठी कॅनडाचा महिला संघ मैदानात उतरणार आहे. त्यांचा सामना  अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिका यांच्यासोबत होणार आहे. डॅनिअल म्हणाली की,  “माझ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणे, हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, याचा मला अभिमान वाटत आहे.” फेब्रुवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाहून कॅनडामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर, डॅनिअलने नोव्हेंबर 2020 मध्ये लिंग बदल केला. त्यानंतर, मे 2021 मध्ये तिच्या वैद्यकीय संक्रमणास सुरुवात केली.

आयसीसीच्या 2018 मधील नियमांनुसार, जर एखाद्या तृतीयपंथीला राष्ट्रीय क्रिकेट संघातून खेळायचे असेल तर त्यांना टेस्टोस्टेरोन चाचणी द्यावी लागेल. आयसीसीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहेत, तर एएफएलच्या धोरणाला प्रतिलिटर 5 नॅनोमोलची मर्यादा आहे. महिन्यापर्यंत 5 नॅनोमोल मर्यादा ठेवावी लागते. या सर्व नियमांमध्ये डॅनिअल पात्र ठरली आहे. त्यामुळे कॅनडाच्या संघात तिची वर्णी लागली आहे. 

आयसीसीने याबाबत आपल्या वक्तव्यात म्हटलेय की, डॅनिअल मॅकगेई हिने आयसीसीच्या सर्व नियमांमध्ये पात्र ठरली आहे. त्यामुळे ती आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकते. 

[ad_2]

Related posts