Babar Azam World Record Happened Because Of Big Mistake By Nepal In Asia Cup 2023 ; नेपाळच्या मोठ्या चुकीमुळे झाला बाबर आझमचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा सामन्यात नेमकं घडलं तरी काय…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुलतान : सध्याच्या घडीला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे जगभरात जोरदार कौतुक होत आहे. बाबरने आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड रचल्याचे समोर आले आहे. पण या सामन्यात नेपाळकडून एक मोठी चूक घडली आणि त्यामुळेच बाबरला हा वर्ल्ड रेकॉर्ड करता आला.

ही गोष्ट घडली ती २९ व्या षटकात. यावेळी नेपाळचा करण केसी हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाबरने दोन धावा घेतल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर दोन चेंडूत एक अशी गोष्ट घडली की बाबरला हा वर्ल्ड रेकॉर्ड करता आला नसता. ही गोष्ट घडली ती २९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर. या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बाबर करत होता. पण यावेळी बाबरला चेंडू नेमका कसा आले हे समजले नाही. त्यामुळे हा फटका मारताना त्याची मोठी गफलत झाली. करणने स्टम्हच्या दिशेने हा चेंडू टाकला होता. हा चेंडू दुसऱ्या बाजूला मारण्याचा प्रयत्न बाबर करत होता. पण यावेळी बाबरला चेंडू समजला नाही आणि त्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकला. बाबरचे यावेळी टायमिंग चुकले. त्यामुळे या चेंडूवर मोठा फटका बाबरला मारता आला नाही. बाबरने चेंडू मारला खरा, पण तो चेंडू थेट गोलंदाज करणच्या हातामध्ये विसावणार होता. पण यावेळी चेंडू टाकल्यावर करण हा योग्य पोझिशनमध्ये नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हातात आलेला हा झेल करणला पकडता आला नाही आणि बाबरला जीवदान मिळाले. करणने यावेळी जर हा झेल पकडला असता तर बाबर हा ५४ धावांवर बाद झाला असता आणि त्याचे शतक पूर्ण होण्याचा काहीच संबंध नव्हता. पण नेपाळच्या संघाकडून झालेल्या एका चुकीमुळे बाबरला वर्ल्ड रेकॉर्ड करता आला आहे.

बाबरने नेमका कोणता वर्ल्ड रेकॉर्ड केला, जाणून घ्या

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १९ वे शतक झळकावण्याचा विश्वविक्रम आता बाबरच्या नावावर आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने १०४ सामन्यांमध्ये १९ वे वनडे शतक झळकावले होते, तर बाबरने १०२ डावांमध्ये आपले १९ वे वनडे शतक साजरे केले आहे. त्यामुळे आता सर्वात जलद आंतरराष्ट्रीय वनडे शतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता बाबरच्या नावावर रचला गेला आहे.

[ad_2]

Related posts