Bombay High Court Direct To BMC Said Work On Open Manholes Before Monsoon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

High Court On BMC: मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यावरील उघडी मॅनहोल्स मान्सूनपूर्वी तातडीनं सुरक्षित करणं ही जबाबदारी बृहनमुंबई महानगर पालिकेची (BMC) आहे, असं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं (Hgh Court) एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात उघडी मॅनहोल मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घेणंही आवश्यक असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट करत मुंबई महापालिकेला मॅनहोल सुरक्षित करण्यासाठीच्या उपयायोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

वांद्रे पश्चिम येथील 16 व्या रस्त्यावर सध्या 4 मॅनहोल उघडी असल्याची बातमी नुकतीच एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी 84 कोटी रुपयांचा निधी देऊनही रस्त्यावरील मॅनहोल उघडीच असल्यानं तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं साल 2018 रोजी दोनवेळा आदेश देऊनही पालिकेकडून अद्याप त्या आदेशांची पुर्तता झालेली नाही. ही बाब निदर्शनास आणणारी अवमान याचिका वकील रुजू ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या प्रश्नांबाबत पालिकेला विचारणा केली असता, सदर तक्रारीची पालिकेनं दखल घेतली असून लवकरच समस्येचे निवारण करण्यात येईल, अशी हमी पालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला दिली. तसेच त्वरीत दखल घेण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये खासगी कंपन्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मॅनहोलच्या प्रश्नावर तक्रारी आल्यावर त्याचे तात्काळ निवारण करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी हायकोर्टाला दिली. तर दुसरीकडे, मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया सुरू केल्याचेही साखरे यांनी हायकोर्टाला सांगितलं. त्याची दखल घेत उघड्या मॅनहोलबाबत कोणती पावले उचचली आणि केलेल्या कायमस्वरुपी उपाययोजनांची माहिती सविस्तर प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देत सुनावणी 8 जून रोजी निश्चित केली आहे.

मॅनहोलमुळे अपघाताची भीती 

मुंबईत पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा प्रश्न अतिशय गंभीर होतो. मॅनहोन उघडे राहिल्याने अपघात, जीवितहानी होण्याचा मोठा धोका आहे. 2017 मधील पावसाळ्यात मुंबईतील नावाजलेले डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून दुर्देवी मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे प्रभादेवी स्थानक परिसरात पाणी साचले होते. त्यावेळी अमरापूरकर यांनी आपली कार तिथेच सोडून पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी पावसाच्या पाण्याचे विसर्ग करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्याने रस्त्यावरील मॅनहोल उघडे ठेवले होते. याचा अंदाज न आल्याने डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा गटारात पडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह वरळीजवळील समुद्राजवळ आढळून आला होता.  या घटनेने मुंबईकरांनी हळहळ व्यक्त केली होती.  

 

[ad_2]

Related posts