Akash Madhwal Became The Hero Of Victory For Mumbai Indians ; मुंबईच्या विजयाचा हिरो ठरलेला कोण आहे आकाश मढवाल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो वेगवान गोलंदाज आकाश मढवालने. कारण आकाशने पहिल्या तीन षटकांत फक्त चार धावांत चार फलंदाजांना पेव्हेलियनमध्ये धाडले होते. त्यामुळे मुंबईच्या विजयात सर्वात मोठा वाटा हा आकाशचा होता. पण हा आकाश मढवाल नेमका आहे तरी कोण, याची माहिती आता समोर आली आहे.
नेमका आहे कोण हा आकाश मढवाल
मूळचा उत्तराखंडचा असलेल्या आकाश मढवालचा गेल्या वर्षी मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला होता. त्याला सूर्याच्या जागी संघआत संधई देण्यात आली होती. हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे काही सामन्यांतून तो बोहेर पडला होता. आकाशने यंदा आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध मुंबईकडून पदार्पण केले. या सामन्यातील डेथ ओव्हरमध्येही त्याने अशीच भन्नाट कामगिरी केली होती. आकाशने पहिल्याच षटकात १६ धावा दिल्या. यानंतर कर्णधार रोहितने त्याला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. आकाशने १८व्या षटकात १२ आणि २०व्या षटकात ९ धावा दिल्या. लखनौच्या या सामन्यात तर त्याने कमालच केली. कारण आकाशची ही कामगिरी स्वप्नवत अशीच ठरली. पहिल्या तीन षटकांमध्ये तर त्याने फक्त चार धावांत चार बळी मिळवले होते. त्यामुळे मुंबईच्य़ा विजयात त्याने सर्वात मोठा वाटा उचलला होता. पण आकाश हा स्थानिक क्रिकेट खेळून इथपर्यंत पोहोचला आहे. मुंबईच्या संघाने त्याची स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी पाहिली होती आणि त्यानंतरच त्याला संघात स्थान दिले.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

मुंबईसाठी निळ्या जर्सीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणारा आकाश मधवाल उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. इतकेच नव्हे तर आकाश उत्तराखंड संघाचा कर्णधारही आहे. तो लिस्ट ए आणि टी-२० मध्ये संघाचे नेतृत्त्व करतो. आकाशला १० फर्स्ट क्लास, १७ लिस्ट ए आणि २५ टी-२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने प्रथम श्रेणीत एकूण १२ विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, लिस्ट ए मध्ये त्याच्या एकूण १८ विकेट आहेत तर टी-२० मध्ये त्याने २५ विकेट घेतल्या आहेत.

[ad_2]

Related posts