MI Vs LSG Match News; मुंबई इंडियन्सचा विजय निश्चित, अर्जुन तेंडुलकर ठरणार रोहित शर्माचा हुकमी एक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये एलिमिनेटर मॅच लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यान आज होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये लखनऊ १७ गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई लखनऊच्या बरोबर खाली १६ गुणांनी चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत बघायला मिळेल, अशी चिन्ह आहेत.आयपीएलच्या हंगामात लखऊनचा आतापर्यंत तीन वेळा मुंबईशी सामना झाला आहे. आणि तिन्ही वेळा लखनऊने मुंबईवर विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा पारडं जड आहे. पण मुंबईने जर आपल्या ११ जणांच्या टीममध्ये या दोन खेळाडूंचा समावेश करून त्यांना खेळण्याची संधी दिली तर कदाचित मुंबई आपला लखनऊवर आपला पहिला विजय मिळवू शकते.

अर्जुन तेंडुलकर

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या हंगामात डेब्यु करण्याची संधी मिळाली होती. अर्जुन तेंडुलकरने कोलकाता नाइटरायडर्सविरोधात आयपीएलमधील करिअरचा पहिला सामना खेळला होता. यात अर्जुनने समाधानकारक कामगिरी केली होती. अर्जुनची गोलंदाजी अतिशय अचूक ठरली होती.

अर्जुनने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. ३ गडी बाद केले आहेत. मुंबई अर्जुनला सतत सामन्यांमध्ये खेळवत होती. पण अचानक त्याला संघातून ड्रॉप करण्यात आलं. यामुळे अर्जुन बराच वेळ पॅव्हेलियनमध्ये बसलेला दिसून आला. मुंबईने आज या युवा गोलंदाजाला संधी दिली तर ते प्रभावी ठरू शकेल. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर अर्जुन संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

LSG vs MI: मुंबई इंडियन्सचा संघ मोठ्या बदलांसह उतरण्याची शक्यता, पाहा कोणाला मिळू शकते संधी
डेवाल्ड ब्रेविस

दक्षिण आफ्रिकेचा युवा आणि स्टार स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस हा २०२२च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स महत्त्वाचा भाग होता. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. ब्रेविसने गगनचुंबी षटकारांनी सर्वांची मनं जिंकली होती. ब्रेविसने आयपीएल २०२२ मध्ये डेब्यु केलं होतं. त्याने गेल्या हंगामात ७ सामने खेळले होते. त्यात त्याने १४२.४८ च्या तुफान स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि १६१ धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत एका डावात सर्वाधिक ४९ धावा केल्या आहेत.

IPL 2023:मुंबईचे हे शिलेदार पळवून पळवून मारतात, फॉर्मामध्ये आल्यास लखनऊचं टेन्शन वाढणार, गुजरातशी कोण भिडणार?
गेल्या हंगमात स्टार ठरलेल्या ब्रेविसला २०२३ च्या या हंगामात खेळण्याची संधीच मिळालेली नाही. या हंगामात तो अद्यापर्यंत मैदाना ऐवजी बेंचवर बसलेला दिसून आला. पण ब्रेविस हा मॅच विनर खेळाडू आहे. लखनऊ विरुद्धच्या समान्यत मुंबईने त्याला संधी दिली तर आक्रमक फलंदाजीने तो मुंबईसाठी महत्त्वाचं योगदान करू शकतो.

[ad_2]

Related posts