[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
GK: अरब राष्ट्रांमध्ये वसलेला इस्रायल (Israel) हा एक छोटासा देश आज त्याच्या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगात एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो. हा देश केवळ संरक्षण क्षेत्रातच नाही, तर कृषी (Farming) क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर आहे. इस्रायलमधील कृषी तंत्रज्ञान (Agricultural Technology) इतकं प्रगत आहे की, हा देश समुद्र (Sea) आणि वाळवंटाने (Desert) वेढलेला असूनही तेथील पिकं (Crops) नेहमीच उत्तम दर्जाची येतात. या देशाचं भारतातील शेतकऱ्यांशी (Indian Farmers) नेमकं काय नातं आहे ते जाणून घेऊया.
भारतीय शेतकरी आणि इस्रायल यांचा संबंध
भारत सुरुवातीपासून तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका पुढे नाही. एक काळ असा होता की, भारतात सर्व काही पारंपरिकपणे केलं जात होतं. शेतीच्या मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत सर्वच. जर आधीच्या काळातील शेतीबद्दल बोलायचं झालं, तर जवळपास 100% शेती ही पारंपरिकपणेच केली जात होती, ज्यामुळे भारताला शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं.
पण 1993 मध्ये जेव्हा इस्रायल आणि भारताने कृषी क्षेत्रात हातमिळवणी केली, तेव्हा देशातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारू लागली. सध्याच्या घडामोडीबद्दल बोलायचं झालं तर, आज भारतात इस्रायलच्या सहकार्याने 30 हून अधिक शेतीशी संबंधित प्रकल्प सुरू आहेत.
भारतातील शेतकरी इस्रायलमध्ये जाऊन घेतात प्रशिक्षण
जे भारतीय शेतकरी इस्रायलमधील तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगत शेती करू इच्छितात, त्यांना इस्रायल देश आमंत्रित करतो. यामुळेच अनेक भारतीय शेतकरी प्रशिक्षणासाठी इस्रायलला जातात आणि शेती प्रशिक्षण घेऊन ते पुन्हा भारतात परततात. भारतात आल्यानंतर ते इस्रायलच्या टेक्निकद्वारे शेती करतात आणि उत्पादनात अनेक पटींनी वाढ करतात.
सध्या भारतात इस्रायलच्या मदतीने अनेक कृषी प्रशिक्षण केंद्रं चालवली जात आहेत, ज्याद्वारे भारतीय शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाशी ओळख करुन दिली जाते. याचा फायदा शेतपिकांना होतो, दर्जेदार पिकांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
हवेतही पिकवला जातो भाजीपाला
जमिनीसोबतच हा देश हवेतील शेतीसाठीही ओळखला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशानेही एरोपोनिक्स तंत्रज्ञानाने शेती सुरू केली आहे. या तंत्रात शेतीसाठी जमीन किंवा मातीची आवश्यकता नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तंत्राचा वापर करून पिकवलेल्या भाज्या या मातीत पिकवलेल्या भाज्यांप्रमाणेच दर्जेदार असतात.
हेही वाचा:
VIDEO: कॅब बुक नाही झाली म्हणून पठ्ठ्याने झोमॅटोवरुन ऑर्डर केलं जेवण; डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर बसून पोहोचला घरी
[ad_2]