Ishan Kishan Rumoured Girlfriend Aditi Hundia Showers Love On Him Dream Innings In Ind Vs Pak Asia Cup 2023 Match Ishan Kishan GF Who Is Aditi Hundia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यात (Ind vs Pak) टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन (Ishan Kishan) संकटमोचक ठरला टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल ठरल्यानंतर ईशान किशनने शानदार फलंदाजी केली आहे. ईशानने दमदार खेळी करत हार्दिक पांड्याच्या साथीनं भारताची बाजू सांभाळली. ईशान किशनच्या गर्लफ्रेंडबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ईशान किशनच्या कथित गर्लफ्रेंडची पोस्ट आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

ईशान किशनच्या दमदार खेळीनंतर गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल? 

पाकिस्तान विरोधात ईशान किशनच्या शानदार खेळीनंतर त्याच्यासाठी खास स्टोरी पोस्ट करणारी एक तरुणी सध्या चर्चेत आहे. या तरुणीचं नाव आदिती हुंडिया असं आहे. ईशानच्या दमदा खेळीनंतर आदिती हुंडिया हिनेही कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यानंतर ती चर्चेत आली आहे. आदिती हुंडिया ईशान किशनची गर्लफ्रेंड असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा आहेत. 

आदिती हुंडियाची खास पोस्ट व्हायरल

आदिती हुंडिया ईशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे अनेक वेळा या दोघांना एकत्र फिरताना पाहिलं गेलं आहे. त्यामुळे हे दोघं रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप याबाबत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. असं असलं तरी नेटकरी मात्र, हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं मानत आहेत.

ईशान किशनसाठी आदिती हुंडियाची खास पोस्ट

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास स्टोर शेअर केली होती. याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. ईशान किशन मैदानात फलंदाजी करत असलेला फोटो पोस्ट करत आदिती हुंडियाने लिहीलं की, ‘ड्रीम इनिंग्स… तू या प्रत्येक गोष्टीसाठी पात्र आहेस’ (Dream innings… You deserve every bit of it and more) यासोबत तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला होता. त्यानंतर नेटकरी याला आदितीच्या प्रेमाची कबुली असल्याचं मानत आहेत. 

कोण आहे आदिती हुंडिया?

ईशान किशनच्या फोटोसह इंस्टाग्रामवर हार्ट इमोजी शेअर करणारी आदिती हुंडिया ही व्यवसायाने मॉडेल आहे. अनेकदा तिचं नाव ईशान किशनसोबत जोडलं गेलं आहे. हे दोघं अनेकदा सोबतही दिसले आहेत.

[ad_2]

Related posts