LumpLumpy Skin Disease Y Skin Disease Ban On Cattle Market In Aurangabad District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा (Lumpy Skin Disease) प्रार्दुभाव झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीय सर्व गोवंशीय जनावरे यांची ने-आण करण्यास, वैरण, गवत किंवा अन्य साहित्य, बाधित प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग या क्षेत्राच्या बाहेर नेण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. सोबतच जिल्ह्यात प्राण्यांचे बाजार भरवण्यास, प्राण्यांच्या शर्यती व प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. 

प्राण्यामधील संक्रामक आणि सांसर्गिक रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम -2009 आणि महाराष्ट्र शासन अधिसूचना 17 जून 2022 अन्वये औरंगाबाद जिल्ह्यातील गोवर्गीय लम्पी चर्मरोगाचा प्रादुभार्वच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणतेही गोवर्गीय जनावरांचे बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत आणि आंतर जिल्हा वाहतुक करणे व प्राण्यांच्या शर्यती अयोजित करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश काढले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात लम्पी बाधीत जनावरांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यतील 9 तालुक्यातील 106 गावांमध्ये 515 जनावरे बाधीत असून 76 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बाधीत क्षेत्रातील जनावरांच्या वाहतुक आणि खरेदीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. बाधीत जनावरांची माहिती पशुपालकांस ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखान्यास देणे बंधनकारक आले आहे. तसेच रोग प्रार्दुभाव झालेल्या जनावरांचे विलगीकरण करावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. 

बाधीत जनावरांचा जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित 

रोगप्रार्दुभावग्रस्त जिल्ह्यामधून ऑनलाईन पद्धतीने होणारी खरेदी- विक्री आणि प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. तसेच साथीच्या काळात बाधीत जनावरांचा जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामपंचायत) सहाय्याने विल्हेवाट लावण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच गोठ्यामध्ये आणि परिसरात स्वच्छता आणि निर्जंतूक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतूकीकरण करण्याचे आणि रोग व प्रसारास कारणीभूत डास, माशा, गोचिड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करण्याचे ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका इ. निर्देशित केले आहे. या आदेशाचे पालन करण्यात यावे असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निर्देशित केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Lumpy skin : अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित,  जनावरांच्या वाहतुकीवर बंदी; 413 गावात लम्पिचा प्रादुर्भाव

[ad_2]

Related posts