Association For Democratic Reforms Publish Report On National Party Wealth; करोना काळात राष्ट्रीय पक्षांची चांदी, भाजप काँग्रेसच्या संपत्तीत वाढ पण एकाच पक्षाची घटली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : करोना संकटाच्या २०२० ते २०२२ या दोन वर्षांत लॉकडाउन व त्यानंतरच्या परिणामांमुळे लाखो नागरिकांचे उत्पन्न कमी झाले असले तरीही याच काळात भाजप, काँग्रेस व तृणमूल काँग्रेससह देशातील आठ प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत भरभक्कम वाढ झाली आहे. केवळ मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची संपत्ती घटली आहे; तर तृणमूल काँग्रेसच्या मालमत्तेत सर्वांत जलद म्हणजे वर्षभरात १५१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

निवडणूक सुधारणांवर काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आठ राजकीय पक्षांची मालमत्ता सन २०२०-२१मध्ये ७२९७.१८ कोटी रुपये होती. पुढच्याच वर्षी २०२१-२२मध्ये ती ८८२९.१५ कोटी रुपये झाली. म्हणजेच अवघ्या एका वर्षात या पक्षांच्या संपत्तीत सुमारे २१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते आहे. ‘एडीआर’ने या राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या त्यांच्या मालमत्ता आणि संपत्तीचा आढावा घेऊन अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, तृणमूल काँग्रेस, माकप, भाकप व पी. एस. संगमा यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय लोक पक्ष (एनपीईपी) यांचा समावेश आहे.
व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण नेमके कशासाठी, पोलिसांची पथकं परराज्यात, गूढ कधी उलगडणार?

जोपर्यंत एमएसपी गँरटी नाही तोपर्यंत मत नाही, इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया!

देशात भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. २०२०-२१मध्ये भाजपने घोषित केलेली मालमत्ता ४९९०.१९५ कोटी होती. एका वर्षानंतर २०२१-२२मध्ये ती २१.७ टक्क्यांनी वाढून ६०४६.८१ कोटी झाली. काँग्रेसची मालमत्ता २०२०-२१मध्ये ६९१.११ कोटी होती, ती पुढच्या वर्षी १६.५८ टक्क्यांनी वाढून ८०५.६८ कोटी रुपयांवर पोहोचली. ‘एडीआर’च्या अहवालानुसार या यादीत बहुजन समाज पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे, ज्यांच्या संपत्तीत या काळात घट झाली. मायावती यांच्या या पक्षाची एकूण मालमत्ता २०२०-२१पेक्षा (७३२.७९ कोटी) २०२१-२२मध्ये कमी होऊन ६९०.९१ कोटी रुपये झाली. तृणमूलची मालमत्ता २०२०-२१मध्ये १८२ कोटी होती. ती २०२१-२२मध्ये १५१.७० टक्क्यांनी वाढून ४५८.१० कोटी झाली.

मराठवाड्यातच आरक्षण लढा तीव्र का होतो? इतर विभागात कुणबी मग तिथे नाहीत का? धगधगत्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा रिपोर्ट

स्रोत उघड करण्यास टाळाटाळ

मार्गदर्शक तत्त्वे असूनही राजकीय पक्ष हे कर्ज घेतलेल्या वित्तीय संस्था, बँका किंवा एजन्सींची नावे उघड करत नाहीत, असेही निरीक्षण एडीआरने नोंदवले आहे. या अहवालानुसार या आठही पक्षांवर २०२०-२०२१मध्ये १०३.५५ कोटी रुपयांची देणी होती. काँग्रेसकडे सर्वाधिक ७१.५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. माकपकडे १६.१० कोटी रुपये थकीत होते. २०२१-२२ काँग्रेसची देण्यांची रक्कम ४१.९५ कोटी रुपयांवर तर माकपची देणी १२.२१ कोटी रुपयांवर आली. भाजपनेही ५.१७ कोटींची कर्ज थकबाकी द्यायची बाकी असल्याचे दाखवली आहे.
Uddhav Thackeray : …तेव्हा विकेटकीपर काय करत होते? अजित पवारांसह शिंदे फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

[ad_2]

Related posts