India Squad For ICC ODI World Cup 2023 Kuldeep Yadav Yuzvendra Chahal R Ashwin

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India ODI World Cup Squad 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताच्या 15 जणांच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. या संघ निवडीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत. काही दुखापतग्रस्त खेळाडूंचं कमबॅक झालेय. भारतीय संघ निवडताना फलंदाजीवर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसतेय. वेगवान माराही जबरदस्त आहे. पण फिरकी गोलंदाजी कमवुत असल्याचे दिसत आहे. प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून फक्त कुलदीप यादव याचीच निवड करण्यात आली आहे. आर. अश्विन आणि चहल यांना स्थान दिलेले नाही. तर अष्टपैलू म्हणून रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. 

आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंनाच विश्वचषक संघात स्थान दिलेय. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने संतुलित संघ निवडण्याचा प्रयत्न केला. पण स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज फक्त एकच घेतला आहे. भारतीय उपखंडात सामने होत आहेत, त्यामुळे फिरकीचा दबदबा असेल. पण असे असतानाही फक्त एकच फिरकी गोलंदाज निवडला आहे. कुलदीप यादव याच्या जोडीला अष्टपैलू अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांचा समावेश आहे. कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाला तर स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून एकाच गोलंदाजाची निवड करणे म्हणजे भारताची फिरकी गोलंदाजी कमकुवत झाली, असाच अर्थ होतो. कारण, कुलदीप यादवचा बॅकअप गोलंदाज म्हणून कुणालाही संधी देण्यात आलेली नाही. या कारणामुळे विश्वचषकात भारताला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. भारतीय संघात एकाही ऑफस्पिनर फिरकी गोलंदाजाला स्थान दिलेले नाही. प्रतिस्पर्धी संघात डावखुरे फलंदाज असतील, तेव्हा भारतीय संघ गोलंदाजीत काय रननिती करणार, हे येणारी वेळच सांगेल. 

सर्वोत्कृष्ट संघ निवडलाय – 
विश्वचषकासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट संघाची निवड केली आहे. भारताची फलंदाजी मजबूत झाली आहे. फलंदाजी डेफ्थ आहे. त्याशिवाय आमच्याकडे स्पिन आणि वेगवान गोलंदाजीचे पुरसे पर्याय आहेत, असे रोहित म्हणाला. खेळाडूंचा फॉर्म आणि प्रतिस्पर्धी संघ पाहून प्लेईंग 11 ची निवड केली जाईल, असे रोहित म्हणाला. 

संजू-तिलक यांचा पत्त कट

विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या 15 जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही.  युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांनाही अंतिम 15 खेळाडूमध्ये संधी देण्यात आली नाही.

विश्वचषकासाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव 

[ad_2]

Related posts