Uncertainty Over US President Joe Bidens Participation In G20 Summit India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वॉशिंग्टन, अमेरिका :  भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे प्रमुख भारतात येणे अपेक्षित आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत दौऱ्यावरून माघार घेतल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या भारत दौऱ्याबाबतही अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे. जो बायडन यांच्या पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे बायडन यांच्या भारत दौऱ्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. 

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल्ल बायडन (Jill Biden) यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून  नियमितपणे चाचणी करण्यात येणार असून आजाराशी संबंधित लक्षणांवर देखरेख केली जात असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. 

जी-20 परिषदेसाठी काही दिवस राहिले असताना बायडन यांच्या बाबत समोर आलेल्या या वृत्ताने त्यांच्या भारत दौऱ्याबाबत व्हाईट हाऊसने कोणतीही टिप्पणी केली नाही. नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे 7 सप्टेंबर रोजी भारतात दाखल होणार होते आणि 10 सप्टेंबर रोजी पुन्हा अमेरिकेसाठी परतणार होते. जो बायडन यांनी जी-20 परिषदेतून माघार घेतल्यास मोठा धक्का असेल. याआधी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जी-20 मधून माघार घेतली आहे. बायडन यांनी माघार घेतल्यास तिसऱ्या प्रमुख देशाच्या राष्ट्रप्रमुखांची माघार होईल. 

जी-20 परिषदेसाठी कोणते देशांचे प्रमुख हजर राहणार?

जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.

भारत-अमेरिका द्विपक्षीय चर्चेचे काय?

G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा होती. दोन्ही नेते GE फायटर जेट इंजिन करारावर चर्चा करणार होते. या कराराला अमेरिकेच्या संसदेने नुकतीच मंजुरी दिली होती. त्याशिवाय, लहान आकाराच्या अणुभट्ट्या, व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही चर्चा होणार होती. 

जून महिन्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांची शेवटची भेट झाली होती. त्याआधी 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. 

इतर संबंधित बातमी :

[ad_2]

Related posts