Pune Traffic Hotspot Pune Municipal Corporation Takes Action To Ease Traffic Jams In Ten Key Areas

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Traffic Hotspot : मागील काही महिन्यांपासून पुण्यातील वाहतूक (Pune Traffic Hotspot) कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मागील काही महिन्यांपासून विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. मात्र शहरातील विविध परिसरात सुरु असलेली मेट्रोची कामं आणि रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी जैसे थे आहे. अशातच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. यात पुण्यातील रहदारीच्या 41 ठिकाणांचा समावेश आहे, तर 10 हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. 

पुण्यातील या 41 हॉटस्पॉटमधील 10 (10 Traffic Hotspot In Pune) सर्वाधिक गर्दी किंवा वाहतूक कोंडी होणाऱ्या परिसराची पाहणी करुन त्या ठिकाणांवर विविध योजना राबवून वाहतूक कोंडीला आळा घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. महापालिकेनं आता या दहा महत्त्वाच्या ठिकाणांवरील समस्या सोडवण्यासाठी थेट कारवाई (Pune Police) सुरू केली आहे.

Pune Traffic Hotspot : 10 वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट कोणते?

  • पुणे विद्यापीठ चौकात गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डे दुरुस्त करणे आणि अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात करणे या योजनांचा आखण्यात आल्या आहेत.
  • वाघोली चौकातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाद्वारे सिग्नल यंत्रणा सुधारणे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यावर भर दिला जाणार आहे.
  • पर्णकुटी चौक ते गुंजन चौक, येरवडा परिसरातील रस्त्याची पुनर्बांधणी, पार्किंगला मनाई आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जातील.
  • हडपसर रेल्वे स्थानक ते फुरसुंगी रेल्वे पूलापर्यंत बस वाहतुकीचे नियोजन, रिक्षांवर कारवाई आणि अतिक्रमण हटवणे या योजना राबविण्यात येणार आहे.
  • खडी मशिन चौक ते शत्रुंजय चौकात वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता रुंदीकरण,  दुभाजक आणि सिग्नल बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • कात्रज चौकातून कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
  • वारजे फ्लायओव्हर चौकातील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी चौकाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
  • मुंढवा चौकातील रस्ता रुंदीकरण करणे, डिव्हायडर बसवणे, पार्किंगला बंदी या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
  • नवले पूल ते भूमकर चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे, अतिक्रमणे हटवणे, मोक्याच्या ठिकाणी सिग्नल बसवणे या उपाययोजना करण्यात येणार आहे.
  • लोहगाव ते विश्रांतवाडी हा पोरवाल रस्त्यावर सिग्नल बसवणे आणि पोरवाल रोडलगतचे अतिक्रमण हटवणे हे या भागासाठी अपेक्षित उपाय आहेत. 

[ad_2]

Related posts