Indian World Cup 2023 Team Can Change Till 28th September ; भारताच्या World Cup 2023 च्या संघात आता पुन्हा बदल, टीम जाहीर केल्यावर समोर आली मोठी गोष्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : अजित आगरकर यांच्या निवड समितीने वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पण आता भारताच्या वर्ल्ड कपच्या संघात आता पुन्हा बदल होऊ शकतो, अशी मोठी गोष्ट आता समोर येत आहे.

वनडे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना अपेक्षेनुसार रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले. फलंदाजी सखोल करण्यासाठी गोलंदाजीतील कौशल्याऐवजी अष्टपैलूत्वास प्राधान्य देण्यात आले, असे सांगून राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी निवडीचे समर्थन केले.

वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा संघ सादर करण्यासाठी आयसीसीने ५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, या संघात २८ सप्टेंबरपर्यंत बदल करण्याची मुभा सहभागी संघ; तसेच त्यांच्या बोर्डना असेल. त्यासाठी आयसीसीच्या मंजुरीची आवश्यकता नसेल. भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन वन-डे सामन्यांची मालिका २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास संघात बदल करण्याची संधी बीसीसीआयला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय २८ सप्टेंबरपर्यंत आपल्या वर्ल्ड कपच्या संघात बदल करू शकते. त्यानंतर जर बदल करायची असल्यास बीसीसीआयला आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. जर एखादा खेळाडू जायबंदी असेल किंवा त्याचे काही वैयक्तिक कारण असेल तर त्याला संघाबाहेर जाण्याची परवानगी आयसीसी देऊ शकतो. पण जर २८ सप्टेंबरपर्यंत जर बीसीसीआयने आपल्या संघात बदल केला तर त्यासाठी आयसीसीची परवानगी लागणार नाही.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

भारताच्या वर्ल्ड कपमधील लढती

– ८ ऑक्टोबर, रविवार ः वि. ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

– ११ ऑक्टोबर, बुधवार ः वि. अफगाणिस्तान (नवी दिल्ली)

– १४ ऑक्टोबर, शनिवार ः वि. पाकिस्तान (अहमदाबाद)

– १९ ऑक्टोबर, गुरुवार ः वि. बांगलादेश (पुणे)

– २२ ऑक्टोबर, रविवार ः वि. न्यूझीलंड (धरमशाला)

– २९ ऑक्टोबर, रविवार ः वि. इंग्लंड (लखनौ)

– २ नोव्हेंबर, गुरुवार ः वि. श्रीलंका (मुंबई)

– ५ नोव्हेंबर, रविवार ः वि. दक्षिण आफ्रिका (कोलकाता).

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

– १२ नोव्हेंबर,रविवार ः वि. नेदरलँड्स (बेंगळुरू).

[ad_2]

Related posts