[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यात मोठ्या उत्साहात दहीहंडी (dahihandi pune) साजरी केली जात आहे. प्रत्येक चौकात लहान मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण शहरात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे. मंडई, डेक्कन परिसरापासून तर कोथरुड चांदणी चौकापर्यंत मोठमोठ्या दहीहंडी मंडळांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे चौकाचौकात गर्दी बघायला मिळत आहे. काही ठिकाणी ढोल ताशाचा जल्लोश तर कुठे डीजेवर पुणेकरांनी ताल धरला आहे. सगळीकडे गोविंदा रे गोपाळाचा जयघोष सुरु आहे.
बाबूगेनू, दगडूशेठ मंडळ, मनसेची महिला दहीहंडी मंडळ, अकरा मारुती चौक खजिना विहीर दहीहंडी मंडळ गुरुजी तालीम मंडळ, शनिपार मंडळ, जिलब्या तरुण मंडळ या दहीहंडी पुण्यातील सगळ्यात मोठ्या दहीहंडी आहेत. या सगळ्या मंडळांसोबत तरुणांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात ही सगळी महत्वाची मंडळं असल्यामुळे रस्ते बंद करण्यात आले आहे.
मंडईच्या दहीहंडीजवळ मोठी गर्दी केली आहे तर काही दहीहंडीच्य ठिकाणी कलाकारांना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. भाऊ रंगारी दहीहंडी संगीतकार अजय अतुल, , क्रिकेटर केदार जाधव, अभिनेते प्रविण तरडे, ईशान्य महेश्वरी, डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा यांनी हजेरी लावली आहे तर खडकमाळ मित्रमंडळ दहीहंडीजवळ अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली आहे.
मात्र पुण्यात यंदाचं सगळ्यात मोठं आकर्षण हे तृतीयपंथीयांची दहीहंडी आहे. नारायण पेठेतील गोगटे प्रशालेत ही दहीहंडी फोडली गेली. यावेळी तृतीयपंथीयांचे चार पथकं हजर होते. मोठ्या जल्लोशात यावेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. देशातील हे पहिलंच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक असल्याने अनेकांनी गर्दी केली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
संपूर्ण पुणे शहरात दहीहंडीमुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे शहरात कालपासूनच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी, चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहे. मोठ्या दहीहंडीजवळ मोठ्या संख्येनं पोलीस उपस्थित आहे. रात्री 10 वाजेपर्यंतच यंदा दहीहंडीसाठी आणि जल्लोशाची परवानगी देण्यात आली आहे.
इस्कॉन मंदिरात जल्लोशात जन्माष्टमी साजरी
राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृंदावनातील बरसाना, नंदगाव, गोविंदकुंड, राधाकुंड अशा वेगवेगळ्या ठिकाणांचे देखावे अनुभविण्यासोबतच सुंदर अशा पाळण्यामध्ये राधाकृष्ण विराजमान झालेले असताना प्रत्येक भक्ताने राधाकृष्ण यांना पाळणा देत जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला.
इतर महत्वाची बातमी-
Pune Dahi handi : आला रे आला.. गोविंदा आला! पुण्यात बाळगोपाळांसाठी खास ‘खेळणी दहीहंडी’
[ad_2]