( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 9 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी नोकरीत तुमचे सहकारी आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आज कोणत्याही प्रकारचा निष्काळजी करू नका.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. मोठी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्या.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमची सर्व बिघडलेली कामेही पूर्ण होतील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी आव्हानात्मक असणार आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी पैशांच्या व्यवहारात तुम्ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोणत्याही बाबतीत तुमची फसवणूक होऊ शकते.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुमच्या घरात कोणतेही कीर्तन किंवा जागरण करू शकता. अविवाहित लोकांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमच्या जमिनी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. तुम्हाला अचानक काही जुने रखडलेले पैसे मिळू शकतात.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींचे कुटुंबातील एखाद्याशी काही मतभेद होऊ शकतात. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. तुमच्या पालकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी मुलाच्या बाबतीत तुमचे मन समाधानी राहील. तुमच्या कामात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहून शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा वेळ आनंदात जाईल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शेजारच्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी काही वाद होऊ शकतात.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )