Pune Crime News The Bullets Were Fired From An Illegal Pistol

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत (Pune Crime News)  चांगलीच वाढ झाली आहे. त्यात तरुणांकडून अरेरावी आणि थेट गोळीबारांच्या प्रकरणातदेखील वाढ होत आहे. यातच आता बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना चुकून झाडल्या गेल्या आणि यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 

अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जखमी झालेल्या तरुणावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी अभय छबन वाईकर (वय 22), अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं?

अभय छबन वाईकर आणि अविष्कार तुकाराम धनवडे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकाच गावात राहतात. वाईकर याने दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीर एक पिस्तूल खरेदी केलेले होते. हे पिस्तूल त्याने अविष्कार याच्याकडे हाताळण्याकरता दिले होते. यावेळी अविष्कार याने हलगर्जीपणाने हाताळल्याने पिस्तुल हाताळली आणि गमतीत त्याच्या हातून गोळी झाडली गेली. ही गोळी अभयच्या मानेला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. अभयला दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सांगरुण गावात ही घटना घडली आहे. 

इम्प्रेशन पाडण्यासाठी हवेत केला होता गोळीबार

काहीच महिन्यांपूर्वी मित्रांवर (Friend) केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तिघेरी पुण्यातच राहत होते. या गोळीबारामुळे खडकवासला परिसरात  काही वेळ खळबळ उडाली होती. तेजस प्रकाश गोंधळे, अजिंक्य भानुदास मोडक आणि चेतन मच्छिंद्र मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  

तेजस गोंधळे, अजिंक्य मोडक आणि चेतन मोरे हे तिघे सिंहगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते.  तिघांनीही एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर तिघेही खडकवासला धरणाच्या पाण्याजवळ गेले. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. हा सगळा प्रकार वेटरच्या लक्षात आला होता. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पोलिसांत माहिती दिली होती. पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत तिघेही पोलीस येण्यापूर्वी फरार झाले होते. त्यानंतर गाडीचा नंबर असल्याने तिघांनाही पोलीसांनी पकडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. 

इतर महत्वाची बातमी-

PCMC Drug News : IT सिटी की ड्रग्ज सिटी? पुण्यात MD ड्रग्ज आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणाऱ्यांना बेड्या

 

[ad_2]

Related posts