Iphone 15 Pro Dummies Marathi News Hint At New Action Button Colour Options And More Check Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Pro : Apple 12 सप्टेंबरमध्ये iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. कंपनीने लॉन्च इव्हेंटला ‘वंडरलस्ट’ असे नाव दिले आहे. तुम्ही अॅपलच्या अधिकृत वेबसाइट किंवा यूट्यूब चॅनेलद्वारे ते पाहू शकाल. दरम्यान, लॉन्च होण्यापूर्वी आयफोन 15 आणि 15 प्रो चा एक डमी व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये फोनचे डिझाइन, लुक, कलर ऑप्शन्स आणि इतर फीचर्सची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये दाखविल्यानुसार, iPhone 15 Pro फोन अॅक्शन बटणासह येऊ शकतो. हे बटण कंपनीच्या रिंग किंवा सायलेंट बटणाची जागा घेईल. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अॅक्शन बटणमुळे वापरकर्त्यांना कॅमेरा, मॅग्निफायर, ट्रान्सलेटर, व्हॉईस शॉर्टकट, फ्लॅशलाइट आणि म्यूट टॉगल ण्याची परवानगी मिळते.

 

व्हिडीओमध्ये दाखवलेले डमी मॉडेल सिल्व्हर, ब्लॅक, टायटन ग्रे आणि गडद निळ्या रंगात आहेत. म्हणजेच कंपनी प्रो मॉडेल या रंगांमध्ये लॉन्च करू शकते. iPhone 15 Pro ची फ्रेम मॅट फिनिशसह टायटॅनियमची बनलेली आहे. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची रचना iPhone 14 Pro सारखी दिसते, परंतु डमी पहिल्यांदाच iPhone मध्ये मोठ्या बदलाची पुष्टी करतात.

 

आयफोन 15
iPhone 15 चा डमी व्हिडिओ फोनचे 5 रंग पर्याय दाखवतो. ज्यात पांढरा, काळा, गुलाबी, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. आयफोन 15 च्या फ्रेममध्ये कंपनी
अॅल्युमिनियम वापरू शकतो. बाजूला रिंग/सायलेंट बटण ठेवू शकतो. मात्र, यावेळी कंपनीने बेस मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत ज्यात 48MP कॅमेरा आणि डायनॅमिक आयलंडची सुविधा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 ची किंमत भारतात 80,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते तर 15 Pro ची किंमत 14 Pro पेक्षा $100 जास्त असू शकते. गेल्या वर्षी, iPhone 14 Pro $999 ला लॉन्च करण्यात आला होता, ज्याची किंमत यावेळी $1,099 असू शकते.

या फोनची विक्री सुरू
Motorola च्या Moto G84 5G स्मार्टफोनची विक्री उद्यापासून Flipkart वर सुरू झाली आहे. मोबाइल फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये आहे. तथापि, कंपनी ग्राहकांना ICICI बँक कार्ड्सवर 1,000 रुपयांची सूट देत आहे. यानंतर फोनची किंमत 18,999 रुपये होईल.

[ad_2]

Related posts