Our God Our Vitthal Is Only One Person NCP Leader Sharad Pawar Says Ajit Pawar Group Leader And Minister Sanjay Bansode Maharashtra Politics( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Pandharpur News: आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे, शरद पवार (Sharad Pawar) आहेत, असं वक्तव्य अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) नेते आणि मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या 50 वर्षात त्यांनी जे काम केलं, त्याच विचारला धरून आम्ही काम करत असल्याचंही क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले आहेत. आता परतीची दारं बंद केल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना देव कधी भक्तांना दूर करतो का? आम्ही त्यांच्या विचाराची पूजा करत काम करत राहणार, असं सांगत संजय बनसोडे यांनी शरद पवारांच्या भूमिकेला उत्तर दिलं आहे. 

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. राष्ट्रवादीतील दोन गटांबाबत आघाडीतील मित्र पक्ष वारंवार शंका घेऊ लागल्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षातून बाहेर गेलेल्यांसाठी आता राष्ट्रवादीत परतीचे दरवाजे बंद असल्याची कठोर भूमिका घेतली. शरद पवारांच्या याच वक्तव्यावर बोलताना संजय बनसोडे यांनी आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार असं म्हटलं आहे. यावेळी बोलताना मराठा अथवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत शिंदे सरकार सकारात्मक प्रयत्न करत असून आंदोलकांनी शांततेनं आंदोलन करावं, असं आवाहन यावेळी संजय बनसोडे यांनी केलं आहे. 

मी फुल टाईम क्रीडामंत्री : संजय बनसोडे 

मी फुल टाईम  क्रीडा मंत्री असून दोन महिन्यात क्रीडा क्षेत्रील अनेक निर्णय घेतल्याचंही यावेळी बोलताना संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. लवकरच पुण्यात ऑलम्पिक भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा आणि युवक‌ कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. औरंगाबादला क्रीडा विद्यापीठ, पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ आणि ऑलिम्पिक भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही कामं सुरू करण्यात येणार आहेत. प्रो गोविंदाला खेळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहितीही यावेळी संजय बनसोडे यांनी दिली आहे. 

राजकारण आणि समाजकारण करत असताना शरद पवार साहेब हा एकच आमचा विठ्ठल : संजय बनसोडे 

आम्ही कुठे ही असलो तरी शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो, असंही मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, राजकारण आणि समाजकारण करत असताना शरद पवार साहेब हा एकच आमचा विठ्ठल आहे, त्यांचा विचार घेऊन आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत. आमचे देव जिथे आहे तिथे असले तरी त्यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतोय, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. 

राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आलं आहे. ऑलिम्पिक दर्जाचे खेळ, त्यासंबंधीचे प्रशिक्षण खेळाडूंना दिलं गेलं पाहिजे. यापूर्वी गुजरात, हरियाणा, पंजाब , ओरिसा अशा प्रांतातील खेळाडूंसाठी असं भवन उभारून त्यांना अधिक उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी ही सोय व्हावी यासाठी आपण राज्यात ऑलिम्पिक भवन उभं करणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक खेळात चमकले पाहिजेत. त्या दृष्टीनं या खेळाडूंना सरकारची सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असं सांगताना बारा मुद्दे लक्षवेधी आहेत. त्याआधारे खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, असं बनसोडे यांनी सांगितलं आहे. ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं खेळाडू तयार होण्याचं नियोजन केलं जाणार असल्याचं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. केंद्राच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवून राष्ट्रीय दरवाजाचे खेळाडू तयार करण्यावर आमचा भर असल्याचंही संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. 

Related posts