Shankar Temple History Of Kapardikeshwar Temple In Otur District Pune Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये (Shankar Temple In pune) अनेक पुरातन अशी शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही मंदिर ही शेकडोवर्ष जुनी आहेत. त्यातीलच एक शिवमंदिर म्हणजे पुणे शहराच्या उत्तरेला जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरामधील मांडवी नदीच्या तीरावर असणारे कपर्दिकेश्वर मंदिर (Kapardikeshwar temple) आहे. या शिवमंदिराला 900 वर्ष जुना इतिहास आहे. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाची मोठी यात्रा भरते.

‘तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या  पिंडी’

या ठिकाणी शिवलिंगावरती कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या तांदळाच्या पिंडी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी जवळपास 1 लाखाहून जास्त भक्त दर्शनासाठी येत असतात. या सोबतच श्रावणी सोमवारच्या यात्रेनिमिताने या ठिकाणी कुस्त्यांचा देखील आनंद आपल्याला घेता येतो. सोबतच मंदिराशेजारीच संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधीपैकी ही एक आहे तसेच जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राचे हे उगमस्थान आहे.

मंदिराचा इतिहास- 

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे या मांडवी नदी तीरावर अनुष्ठानासाठी बसले असता त्यांनी एक वाळूचे शिवलिंग तयार केले होते. शिवलिंग तयार करताना त्यांना त्या वाळूत एक कवडी मिळून आली त्या कवडीत  एक शिवलिंग सापडले. संस्कृतमध्ये कवडीला कपर्दीक असे म्हणतात त्यावरून या शिवलिंगाचे कपर्दीकेश्वर असे नामकरण करण्यात आलं आणि सन 1200 च्या शतकात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. चंद्राकार मांडवी नदी तीरावर निसर्गरम्य परिसरात हे पुरातन भव्य मंदिर वसलेले आहे. शिवलिंगाच्या स्थापनेपासूनच येथील पुजारी यांनी प्रत्येक वर्षी  याच शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या पिंडी बांधण्यास सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.

हे सगळे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात –

1. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार
  2. महाशिवरात्री
  3. त्रिपुरारी पौर्णिमा
 4. मंदिराजवळ असणाऱ्या बाबाजी चैतन्य महाराजांचा समाधी सोहळा.

पुणे जिल्ह्यात असे अनेक प्रचीन मंदिर

पुणे जिल्ह्यात असे अनेक प्रचीन मंदिरं आहे. त्यात सह्याद्रीच्या पट्यात अनेक लहान मोठे मंदिरं आहेत. श्रावण महिन्यात प्रत्येक मंदिरात मोठी सजावट केली जाते. मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात आणि त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार पुजा करतात. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : आनंद दिघेंची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरु ठेवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला भिमाशंकर मंदिरात अभिषेक

 

[ad_2]

Related posts