Rohit Sharma Break The Record Shahid Afridi Of Most Sixes Ind Vs Sl Asia Cup 2023 Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023, IND Vs SL Live Updates : कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि गिल यांनी आक्रमक सुरुवात केली, पण वेल्लालागे याने भारताला एकापाठोपाठ एक चार धक्के देत सामना रंगतदार केला. रोहित शर्माने श्रीलंकाविरोधात आक्रमक अर्धशतक ठोकले. रोहित शर्मा अर्धशतकानंतर बाद झाला, पण रोहितने त्याआधी अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहित शर्माने आशिया चषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम नावावर केला आहे. रोहित शर्माने शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडला आहे. 

आफ्रिदीचा विक्रम मोडला – 

आशिया चषकात रोहित शर्माने सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने आशिया चषकात 28 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडलाय. शाहीद आफ्रिदीच्या नावावर 26 षटकार आहेत. तिसऱ्या क्रमांकवर श्रीलंकेचा सनथ जयसुर्या आहे. जयसुर्याच्या नावावर 23 षटकार आहे. या यादीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने आशिया चषकात 18 षटकार ठोकले आहेत. 

 सामन्यात काय झाले ?

रोहित शर्माने श्रीलंकाविरोधात वादळी फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. रोहित शर्मा याने 48 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षठकार आणि सात चौकार ठोकले.  गिल आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली तीन धावांवर बाद झाला तर गिल याने 19 धावांचे योगदान दिले. केएल राहुल याने 39 तर ईशान किशन याने 33 धावांची खेळी केली.  भारताने 34 षटकात पाच बाद 170 धावा केल्या आहेत. 

रोहित शर्माच्या नावावर हाही विक्रम –
आशिया चषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा क्रमांक आहे.  रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे, कसोटी आणि टी20 मध्ये रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. आशिया चषकात रोहित शर्मा याने 50 पेक्षा जास्त धावसंख्या दहा वेळा केल्या आहेत, असा पराक्रम करणारा हिटमॅन एकमेव फलंदाज आहे. 

रोहित दहा हजारी मनसबदार –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला आहे. खणखणीत षटकार ठोकत रोहित शर्माने दहा हजार धावांचा टप्पा पार केला. वेगवान 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 241 डावात दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्माला वनडेमध्ये पहिल्या दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 82 डाव लागले होते. त्यानंतर पुढील 159 डावात रोहित शर्माने 8000 धावा केल्या आहेत. 

[ad_2]

Related posts