India And Saudi Arebia Ties Meeting Between Saudi Arebia Crown Prince And Prime Minister Narendra Modi Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारत (India) आणि सौदी अरेबिया (Saudi Arebia) या दोन्ही देशांमध्ये आठ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. यामुळे भविष्यात दोन्ही देशांच्या अर्थव्यस्थांना गती देण्यासाठी फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद यांच्यामध्ये सोमवारी (11 सप्टेंबर) रोजी द्वीपक्षीय बैठक पार पडली. दोन्ही देशांमध्ये श्चिम किनारपट्टी तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आणि संरक्षण सेमीकंडक्टर, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे. 

हायड्रोकार्बन क्षेत्र महत्त्वाचे 

दोन्ही देशांनी या द्विपक्षीय बैठकीमध्ये  हायड्रोकार्बन क्षेत्रातील ऊर्जा सहकार्यावरही सहमती दर्शवली आहे.  याशिवाय डिजिटलायझेशन आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात एकूण आठ वेगवेगळे करार करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव औसफ सईद यांनी म्हटलं की, पश्चिम किनारपट्टी तेल शुद्धीकरण प्रकल्प हा एनडीएनओसी आणि भारतीय कंपन्यांमधील त्रिपक्षीय सहयोगावर आधारित आहे. तसेच या कामाला देखील आता गती मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

या क्षेत्रांमध्ये सहकार्य करणार 

सचिव औसेफ सईद यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज प्रिन्स यांच्यामध्ये  ऊर्जा, संरक्षण, शिक्षण, तंत्रज्ञान, वाहतूक, आरोग्य सेवा, पर्यटन, संस्कृती आणि सुरक्षा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मला आनंद आहे की या परिषदेअंतर्गत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठका पार पडल्या. यामध्ये प्रत्येक क्षेत्रात आमचे परस्पर सहकार्य वाढत राहिल अशी आशा आहे. खरतर  पश्चिम किनारपट्टी तेल शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रात होणार होती. यासंदर्भातील घोषणा ही 2015 मध्ये करण्यात आली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? 

भारत आणि सौदी अरेबियाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काऊन्सिलच्या पहिल्या बैठकीमध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2019 मध्ये सौदी अरेबियाच्या दौऱ्यावेळी आम्ही या काऊन्सिलची घोषणा केली होती. या चार वर्षांमध्ये आमची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम असणार आहे.  

हेही वाचा :

PM Modi : सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक, महत्त्वाच्या करारांवर केल्या स्वाक्षऱ्या



[ad_2]

Related posts