Barsu Refinery : कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्हं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत यासंदर्भात सहमती झाली. कोकणातील रिफायनरी प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्यानं उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं भारत आणि सौदी अरेबियाची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. सुमारे चार लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, मोदी आणि राजकुमार सलमान यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात ८.२० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.</p>

[ad_2]

Related posts