Pune Ganeshotsav 2023 History Of Ganeshotsav In Pune Maharashtra Lokmanya Tilak( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : शिवकालीन, पेशवेकालीन आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणशोत्सव (Ganeshotsav) अनेक संकटं, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत आजही टिकून आहे आणि जल्लोषात साजरा होत आहे. श्रद्धा हा मुद्दा असला तरीही एखादी चळवळ किंंवा काम सुरु करण्यात आणि काही वर्ष ती चळवळ टिकवण्यात अनेकांचा मोठा उत्साह असतो. मात्र काळानुरुप हा उत्साह कमी होतो. मात्र लोकमान्यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा अनेक दशकांनंतरही अजूनही टिकून आणि मोठ्या उत्साहात साजरादेखील होत आहे. गणेशोत्सव टिकून राहण्याची अनेक महत्वाची कारणं देखील आहे. 

गणेशोत्सवाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद सराफ सांगतात की, गणेशोत्सवाची व्यापकता आणि परिवर्तनशीलता हे गणेशोत्सवाचे अंगभूत गुण आहेत. गणेशोत्सवाचे  जनमानसाचा प्रभाव आणि दबाव लक्षात घेऊन परिवर्तन स्वीकारलं आहे. काळाच्या कसोटीवर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था टिकून राहायची असेल तर त्याने काळानुरुप बदल घडवणं आवश्यक असतो आणि गणेशोत्सवाने हा बदल स्विकारला आहे. 

कार्यकर्ता गणेशोत्सवाचा आत्मा असतो. देव, देश आणि धर्माच्या जपणूकीसाठी भारावलेला असतो. त्यात लोकमान्य टिळकांची शिकवण मानणारा हा कार्यकर्ता असतो. काळानुरुप या गणेशोत्सवात झालेले बदल कार्यकर्त्यांनीदेखील सकारात्मकतेने स्विकारले. घर-दार झोकून देत 10 दिवस गणेशोत्सवात समर्पित केलं होतं. 

लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य मिळावण्यासाठी लोकांना एकत्र आणणं महत्वाचं वाटलं. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. या माध्यमातून जनजागृती करणे. लोकांना अनेक गोष्टींचं महत्व पटवून देणे आणि ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करणे, हे टिळकांचं ध्येयं होतं. त्यानुसार त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांनी या गणेशोत्सवाला पाठिंबा दिला. त्यानंतर मंडपात लोकं जमू लागली आणि  ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करण्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी भक्कम कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली. हेच कार्यकर्ते या गणेशोत्सवाचा आत्मा बनले या कार्यकर्त्यांनी लोकमान्यांची शिकवण पुढे नेत सगळे बदल स्विकारले आणि गणेशोत्सव साजरे केले.

स्वातंत्र्यानंतर सुराज्याची चळवळ?

स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती हे गणेशोत्सवाचं उद्दिष्ट होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुराज्याच्या चळवळीला सुरुवात झाली. सुराज्याची चळवळ कशी यशस्वी करायची याचा विचार कार्यकर्ते आणि त्यांच्या नेतृत्वाने केला. लोकमान्यांच्या पश्चात विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी विखुरलेलं नेतृत्व एकत्र आणत देशहिताचा विचार केला.  हा विचार करताना कार्यकर्त्यांनी काळानुरुप बदल स्विकारले आणि 2023 मध्येही टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

Related posts