IPhone 15 Pro Or 14 Pro What Is The Difference Between Price And Features Get To Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro :  Apple ने मंगळवारी iPhone 15 सीरिज लाँच केली, ज्यामध्ये Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच केले. मात्र iPhone 15 Pro आणि iPhone 14 pro या दोनीपैकी कोणता फोन तुमच्याकरता चांगला आहे? Apple ने iPhone 15 Pro मध्ये USB Type C चार्जर दिला आहे. जे तुमच्या iPhone 15 Pro, iPad आणि Airpods चार्ज करण्यास सक्षम असतील. आता तुम्ही तुमचा डेटा Apple iPhone वरून केबलद्वारे ट्रान्सफर (Transfer) करू शकाल. या फरकाशिवाय iPhone 15 Pro आणि iPhone 14 Pro मधील फरक काय आहे ते जाणून घेऊयात.

iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro ची किंमत

Apple चा iPhone 14 Pro कंपनीने भारतात 1,29,900 रुपयांना लाँच केला होता. iPhone 15 मालिका लाँच केल्यानंतर Apple ने iPhone 14 Pro बंद केला आहे, परंतु सध्या तुम्ही 1,19,999 रुपयांना ई-कॉमर्स साईटवरून iPhone Pro खरेदी करू शकता. iPhone 15 Pro च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर तो भारतात 1,34,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.

काय आहे साम्य (What is the similarity In iPhone 15 Pro And iPhone 14 Pro?)

दोन्ही फोनमध्ये या दोन्ही फोनमध्ये 6.1 इंच OLED स्क्रीन मिळते. याचं रिझॉल्यूशन 2,556×1,179 पिक्सेल्स आहे. तर रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर फोनची पिक्सेल डेन्सिटी 460 ppi आहे. फोनमध्ये iOS 17 हे मोबाईल साॅफ्टवेअस वापरण्यात आले आहे. कॅमेराविषयी बोलायचे झाल्यास 48-megapixel (wide), 12-megapixel (ultrawide), 12-megapixel telephoto (3x optical) देण्यात आले आहे. फ्रंट कॅमेरा 12-megapixel आहे. दोन्ही फोममध्ये 4K क्वलिटीचे व्हिडीओ कॅप्चर केले जाऊ शकतात.  फिंगरप्रिंट सेन्सर मिळत नाही.दोन्ही फोनमध्ये हेडफोन जॅक मिळत नाही.

काय आहे फरक (What is the difference between iPhone 15 Pro and iPhone 14 Pro?)

iPhone 15 चा आकार iPhone 14 पेक्षा मोठा आहे. पण या दोन्ही फोनमध्ये असणारा मोठा फरक म्हणजे iPhone 15 USB-C चार्जिंग पोर्ट आहे तर iPhone 14 लाईटनिंग पोर्ट आहे. यामधील प्रोसेसर देखील वेगळे आहेत. iPhone 15 A17 बायोनिक चिप देण्यात आली आहे तर iPhone 14 मध्ये A16 बायोनिक चिप वापरण्यात आली आहे. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts