SmartPhone Tips Follow These Easy Tips To Get Rid Of Common Android Smartphone Issues Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

SmartPhone Tips : आजकाल लोक स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. आजच्या डिजीटल युगात लोकांना स्मार्टफोन वापरणे हा एकमेव पर्याय आता राहिलेला आहे. सध्या अनेक भन्नाट फिचर्सचे फोन बाजारात लाँच केले जातात. आता 1TB स्टोरेज असलेले फोनही बाजारात उपलब्ध आहेत. जितके नवनवीन अपडेट फोनमध्ये येत असतात. मात्र जितके अपडेट्स आता येत आहेत ते ज्या पद्धतीने चांगले आहे तितकेच ते अडचणी देखील वाढवत आहेत. ज्यावेळी हे चांगल्या गुणवत्तेचे फोन खराब झाल्यानंतर त्यावर हजारो रूपये खर्च करावे लागतात. तर तुमचा फोन सुरक्षित ठेवण्याकरता काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. 

स्मार्टफोनचा वेग कमी होणे

स्मार्टफोनचा वेग कमी होणे हे सध्याची सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या नीट करण्याकरता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील वापरात नसलेले अॅप्स डिलीट करावे लागतील. तसेच स्मार्टफोनची मेमरीही क्लिअर करावी लागेल. असे केल्यास तुमचा स्मार्टफोन नीट चालू लागेल.

स्मार्टफोन खूप गरम होणे

अनेकदा आपण स्मार्टफोन चार्जिंगला लावून तो वापरत बसतो. त्यामुळे तो खूप गरम होतो. तर फोन चार्जिंगला असताना तो वापरणे चुकीचे आहे. तसेच फोनचब्राईटनेस कायम कमी ठेवा. चार्जिंग कमी असल्यास तुम्हाला फोन पॉवर सेव्हर मोडवर ठेवावा लागेल. तुम्हाला गरज नसल्यास वाय-फाय आणि ब्लूटूथ वापरू नका.

स्मार्टफोनची बॅटरी लवकर कमी होणे

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असल्यास, तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी करणे गरजेचे आहे. तसेच विनाकारण लोकेशन,  ब्लूटूथ, मोबाईल डेटा सुरू ठेऊ नये. 

फोन सतत हँग होणे

फोन हँग होण्याची समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची मोठी समस्या म्हणजे स्मार्टफोन वारंवार हँग होतो. Android व्हर्जनचे नवीन अपडेट आले असेल तर ते लगेच डाउनलोड करून फोनवर इंस्टॉल करा. फोनमधील सर्व Apps आणि सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहणे आवश्यक आहे. बँकग्राउंडला कोणते अॅप्स चालू असतील ते लगेच क्लिअर करणे गरजेचे आहे.

 नेटवर्क काम न करणे

अनेकदा नेटवर्कच्या ठिकाणी असूनही फोनमध्ये नेटवर्क दाखवत नाही. फोनच्या सेंटींगमध्ये बिघाड झाल्यानंतर अशा समस्या उद्धभवतात. अशा वेळी फ्लाईट मोड हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे. तुमचा फोन थोडा वेळासाठी फ्लाईट मोडवर टाकावा आणि पुन्हा सुरू करावा. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

iPhone Radiation : फ्रान्समध्ये आयफोन 12 विक्रीवर बंदी, रेडिएशन पसरवत असल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

[ad_2]

Related posts