Malegaon Blast Mumbai Nia Court Hearing Update On 2008 Blast Case Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात सर्व साक्षीपुरावे तपासून पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हा खटला आता अंतिम टप्यात आला आहे, असं म्हणता येईल. याप्रकरणी भाजपच्या विद्यमान खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य सहा आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत खटला सुरू आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्यावतीनं विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ यांनी विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांना याप्रकरणातील सर्व साक्षीपुरावे तपासून पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच आता आणखी नव्या साक्षीदारांच्या तपासणीची आवश्यकता नसल्याचंही स्पष्ट केलं. मागील पाच वर्षांत याप्रकरणी एकूण 323 साक्षीदार तपासण्यात आले असून त्यापैकी 37 साक्षीदार फितूर घोषित झाले आहेत. न्यायालय आता फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 313 अंतर्गत आरोपींचे आणि बचाव पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब आणि अंतिम युक्तिवाद नोंदवून घेईल.

या प्रक्रियेसाठी सर्व आरोपींना जबाबासाठी 25 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. यावेळी कोर्टानं आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनं एका साक्षीदाराची साक्ष पुन्हा नोंदवण्याची विनंती करत दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला.

काय आहे प्रकरण? 

29 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथील एका मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) केल्यानंतर साल 2011 मध्ये एनआयएकडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला. एनआयएनं साल 2016 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, श्याम साहू, प्रवीण टाकल्की आणि शिवनारायण कालसांग्राला आरोपींना क्लीन चिट देऊन त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत त्यामुळे, त्यांना या प्रकरणातून सोडण्यात यावं अशी मागणी करत आरोपपत्र दाखल केलं. साल 2017 मध्ये न्यायालयानं, प्रज्ञासिंह ठाकूर यांनाही आरोपांतून वगळूत साहू, कलसांग्रा आणि टाकल्की यांना दोषमुक्त केलं. 

यामध्ये पुढे राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांचीही या खटल्यातून मुक्तता केली गेली. यावेळी न्यायालयानं आरोपींना मकोका आरोपातून वगळलं. पुढे 30 ऑक्टोबर 2018 रोजी विशेष न्यायालयानं सात आरोपींविरुद्ध युएपीए आणि भदंविच्या कठोर कलमांतर्गत आरोप निश्चित केले. यामध्ये कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे तर काही आरोपी अद्यापही फरार आहेय. हे आरोपनिश्चित केल्यानंतर, खटल्यातील पहिल्या साक्षीदाराच्या तपासणीसह साल 2018 मध्ये हा खटला सुरू झाला होता.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts