The luck of these 3 zodiac signs will shine Bhadra Rajyog is being formed in Virgo will get immense wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhadra Rajyog: येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8:29 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचा कन्या राशीत प्रवेश झाल्यामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ परिणाम होणार आहे. मात्र यावेळी लोकांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान या काळात बुधाच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा बुध कुंडलीत कन्या किंवा मिथुन राशीमध्ये, चढत्या भावात किंवा चंद्रापासून 1, 4, 7 किंवा 10 व्या भावात असतो, तेव्हा भद्र राजयोग तयार होतो. भद्रा राजयोग हा शुभ योगांपैकी एक मानला जातो. भद्रा राजयोगाच्या निर्मिती काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास (Mithun Zodiac Sign)

मिथुन राशीच्या लोकांना भद्रा राजयोग तयार झाल्याने विशेष लाभ मिळू शकणार आहे. नवीन मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खूश असणार आहेत. या काळात तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. 

सिंह रास (Sign Zodiac Sign)

या राशीमध्ये दुसऱ्या घरात भद्र राजयोग तयार होत आहे. या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. करिअरसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक स्थितीही मजबूत असणार आहे. अनावश्यक खर्चामुळे काही त्रास होऊ शकतो. 

कन्या रास (Kanya Zodiac Sign)

या राशीमध्ये प्रथम घरात भद्र राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही लाभ मिळू शकतो. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. खूप दिवसांपासून सुरू असलेले काम आता व्यवस्थित सुरू होऊ शकेल. तुम्ही शेअर मार्केट आणि लॉटरीत पैसे कमवू शकता. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts